Join us

Student-of-the-Year-2: सारा अली खान ‘आऊट’, दिशा पटानी ‘इन’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2017 13:36 IST

सैफ अली खान आणि अमृता सिंह या दोघांची मुलगी सारा अली खान  बॉलिवूड डेब्यू करणार, अशी चर्चा ब-याच दिवसांपासून ...

सैफ अली खान आणि अमृता सिंह या दोघांची मुलगी सारा अली खान  बॉलिवूड डेब्यू करणार, अशी चर्चा ब-याच दिवसांपासून कानावर येतेय. करण जोहरच्या ‘स्टुंडट आॅफ दी इयर2’मधून सारा अली बॉलिवूड डेब्यू करणार, अशी एक बातमीही मध्यंतरी कानावर आली होती. साराच्या बॉलिवूड डेब्यूकडे डोळे लावून बसलेल्यांसाठी ही आनंदाची बातमी होती. पण आता एक भलतीच बातमी आहे. ही बातमी साराच्या चाहत्यांच्या आनंदावर पाणी फेरणारीआहे. होय, ‘स्टुंडट आॅफ दी इयर2’मध्ये साराऐवजी दिशा पटानी हिची वर्णी लागल्याची खबर आहे. (होय, तीच ती टायगर श्रॉफची कथित प्रेयसी)म्हणजे, साराचा पत्ता कट. ‘स्टुंडट आॅफ दी इयर2’मध्ये टायगर श्रॉफ आहे, हे तर पक्के झालेय. आता यात टायगरला म्हणे, दिशा हीच त्याची हिरोईन असावी,अशी इच्छा होती. कदाचित टायगरच्या याच इच्छेखातर या चित्रपटात दिशाची एन्ट्री झाली. साहजिकच टायगर आहे म्हटल्यावर दिशाने या चित्रपटाला नकार देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. टायगर व दिशाच्या प्रेमप्रकरणाच्या चर्चा तुमच्या-आमच्यासाठी नवी नाही. दोघांनाही बºयाचदा एकत्र पाहिले गेलेय. अर्थात तरिही आमच्यात प्रेम वगैरे काही नसून निव्वळ मैत्री असल्याचे हे दोघेही सांगत असतात. आता खरे काय, ते ठाऊक नाही. प्रेम असो वा मैत्री...‘स्टुंडट आॅफ दी इयर2’च्या सेटवर दोन्हीही बहरणार, इतके मात्र नक्की.करण जोहरच्या ‘स्टुंडट आॅफ दी इयर’ हा चित्रपट सुपरहिट ठरला होता.  अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा, वरुण धवन आणि अभिनेत्री अलिया भट्ट या तीन तरुण कलाकारांनी या चित्रपटाद्वारे बॉलिवूड डेब्यू केले होते.  आता निमार्ता-दिग्दर्शक करण जोहर या चित्रपटाचा सीक्वल घेऊन येतोय. तेव्हा टायगर व दिशाची यातील आॅनस्क्रीन केमिस्ट्री पाहण्यासाठी सज्ज असा.