Join us
Daily Top 2Weekly Top 5

आदित्यची दिल्लीत स्ट्रीट शॉपिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 08:29 IST

 सध्या आदित्य रॉय कपूर आणि कॅटरिना कैफ हे दोघेही ‘फितूर’ मुळे खुप चर्चेत आहेत. ते दोघेही सध्या दिल्लीच्या स्ट्रीट ...

 सध्या आदित्य रॉय कपूर आणि कॅटरिना कैफ हे दोघेही ‘फितूर’ मुळे खुप चर्चेत आहेत. ते दोघेही सध्या दिल्लीच्या स्ट्रीट शॉपिंगचा आनंद उपभोगत आहेत. ते फितूरच्या प्रमोशनसाठी दिल्लीत गेले आहेत. दिल्लीतील जनपथ मार्केट येथे ते एकमेकांसाठी खरेदी आहेत. त्यांच्या बिझी शेड्यूलमधून वेळ काढून त्यांनी खरेदीला सुरूवात केली आहे. कॅट तिचे केस आणि ड्रेसेस यांच्यासाठी फार चर्चेत असून ती तिचे कॅरेक्टर एन्जॉय करत असल्याचे सांगते. एकमेकांना ते गिफ्ट देत असून आदित्यने कॅटला ईअररिंग्ज आणि बांगड्या खरेदी करण्यासाठी मदत देखील केली. अभिषेक कपूर दिग्दर्शित चित्रपट ‘फितूर’ मध्ये ते दोघे आॅनस्क्रीन रोमान्स करताना तर दिसणार आहेतच. पण चक्क स्ट्रीटवरही त्यांचा खुलेआम रोमान्स सुरू होता.