Join us

​‘नाम शबाना’ची कथा सत्यघटनेवर आधारित

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2017 18:46 IST

बॉलिवूडमध्ये सत्य घटनेवर आधारित कथानक लिहणाºया दिग्दर्शकांत नीरज पांडे यांचा उल्लेख केला जातो. नीरज पांडे यांनी वेडनस डे, स्पेशल ...

बॉलिवूडमध्ये सत्य घटनेवर आधारित कथानक लिहणाºया दिग्दर्शकांत नीरज पांडे यांचा उल्लेख केला जातो. नीरज पांडे यांनी वेडनस डे, स्पेशल छब्बीस व एम.एस. धोनी अनटोल्ड स्टोरी या सारख्या चित्रपटांची निर्मिती केली आहे. हे सर्वच चित्रपट सत्य घटनेवर आधारित होते. यामुळे चाहत्यांना देखील ते आवडले, नीरजचा आगामी चित्रपट नाम शबाना देखील सत्य घटनेवर आधारित आहे. नीरज पांडे याला मोठ्या स्तरावरील इंटेलिजंड पोलीस केसेसवरील चित्रपटांची निर्मिती करण्यासाठी ओळखले जाते. नीरजच्या नजीकच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्याचा आगामी चित्रपट नाम शबाना सत्य घटनेवर आधारित चित्रपट आहे. अनेक रॉ एजेंट एका विशिष्ठ्य कामाकरिता नियुक्त केले जातात. यात हनी ट्रॅप देखील सामील आहे. यामाध्यामतून त्याच्या जीवनातील काही तथ्य काढण्यात ााले आहे. असे सांगण्यात येते की हा चित्रपट अशा महिलेवर आधारित आहे जो एका सिस्टमचा महत्त्वाचा भाग आहे. ज्या लोकांना ‘नाम शबाना’ची स्टोरी लाईन माहित आहे. त्यांच्या मते पूर्वाश्रमीची रॉ एजेंट स्वत:ला शबाना नावाच्या चरित्राशी जोडू शकतील. अभिनेत्री तापसी पन्नू या चित्रपटात शबानाची भूमिका साकारत आहे. ‘नाम शबाना’ तापसी पन्नूच्या बेबी मधील भूमिको स्पिन आॅफ आहे. असा प्रयोग भारतीय चित्रपटात पहिल्यांदाच केला जात आहे. ३१ मार्च रोजी प्रदर्शित केला जाणारा ‘नाम शबाना’ हा चित्रपटाचे सादरीकरण गुलशन कुमार आणि केप आॅफ गुड फिल्मस करीत आहे. अ प्लान स्टुडीओ प्रोडक्शनचे नीरज पांडे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.