Join us
Daily Top 2Weekly Top 5

सारा अली खानने ऐकली नाही अभिषेक कपूरची ही गोष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2017 12:03 IST

सैफ अली खान आणि त्याची पूर्वपत्नी अमृता सिंगची मुलगी सारा अली खान सध्या अभिषेक कपूरचा आगामी चित्रपट केदारनाथला घेऊन ...

सैफ अली खान आणि त्याची पूर्वपत्नी अमृता सिंगची मुलगी सारा अली खान सध्या अभिषेक कपूरचा आगामी चित्रपट केदारनाथला घेऊन बिझी आहे. या चित्रपटात तिच्यासोबत सुशांत सिंग राजपूत दिसणार आहे. साराचा डेब्यू चित्रपट अजून पूर्ण झाला नाही तोच साराला पुढच्या चित्रपटांसाठी ऑफर पण येऊ लागल्यात. मिड-डेच्या रिपोर्टनुसार अनुष्का शर्माच्या प्रोडक्शन क्लीन स्टेल फिल्म्स अंतर्गत तायर होणाऱ्या या चित्रपटात साराला कास्ट करायचे आहे. आतापर्यंत आपल्या प्रोडक्शन हाऊस अंतर्गत तायर होणाऱ्या चित्रपटात अनुष्का स्वत:चे काम करत आली आहे. मात्र  या चित्रपटात लीड रोलसाठी अनुष्काला साराला घ्यायचे आहे.  या प्रोजेक्टबाबत बोलायचे झाले तर हा चित्रपट एक सोशल ड्रामा असणार आहे. जेव्हा अनुष्का शर्मा, क्रिअर्ज एंटरटेन्मेंटची प्रेरणा अरोरा आणि अर्जुन शर्मा या चित्रपटासाठी लीडच्या शोधात होते. त्याचवेळी त्यांनी सारा अली खानला घेण्याचा निर्णय घेतला. प्रेरणा आणि अर्जुन सारासोबत 'केदारनाथ'मध्ये काम करतायेत आणि साराचे काम त्यांना खूप आवडले. तसेच ज्यावेळी साराला या चित्रपटाची कथा वाचून दाखवण्यात आली तेव्हा तिलाही ती आवडली. त्यानंतर तिचे नाव या प्रोजेक्टसाठी फायनल करण्यात आले. केदारनाथचा दिग्दर्शक अभिषेक कपूरची इच्छा होती की साराने केदारनाथचे काम पूर्ण होई पर्यंत कोणत्याही दुसऱ्या प्रोजेक्टला हात लावू नये. मात्र साराने अभिषेक कपूरची ही गोष्ट ऐकवली नसल्याचे या रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे. तर तिकडे दुसरीकडे उत्तराखंडमध्ये असलेल्या जोरदार थंडीमुळे चित्रपटाचे शूटिंग थांबवण्यात आले आहे. याकारणामुळे आता हा चित्रपट पुढच्या वर्षीच्या अखेरीस रिलीज होणार आहे आणि साराला ऐवढे वेळ थांबायचे नाही आहे. त्यामुळे तिने पुढच्या चित्रपटासाठी होकार दिला आहे.  ALSO RAED :  सारा अली खानचे ताजे फोटो...तुम्हालाही लावतील वेड...!!केदारनाथ हा चित्रपट २०१३ मध्ये ‘केदारनाथ’मध्ये आलेल्या प्रलयाच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे. अभिषेक कपूर या चित्रपटाचे दिग्दर्शन करतो आहे. चित्रपटात सारा एक साधी आणि गर्ल नेट डोरच्या इमेजमध्ये दिसणार आहे. वास्तविक सारा खूपच स्टायलिश आणि ट्रेण्ड फॉलो करणारी मुलगी आहे; मात्र या चित्रपटात तिची भूमिका तिच्या पर्सनॅलिटीशी अगदीच विभिन्न प्रकारची आहे. तर सुशांत सिंग राजपूत पिठ्ठूची भूमिका साकारणार आहे.