शाहरुखवरील फालतू शेरेबाजी थांबवा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2016 14:55 IST
शाहरुखनं देशातील असहिष्णुतेच्या वातावरणाविषयी केलेल्या वक्तव्यानंतर योगी आदित्यनाथ यांनी त्याची तुलना हाफिज सईदशी केली होती.त्यावर शाहरुख खानच्या सर्मथनार्थ ...
शाहरुखवरील फालतू शेरेबाजी थांबवा
शाहरुखनं देशातील असहिष्णुतेच्या वातावरणाविषयी केलेल्या वक्तव्यानंतर योगी आदित्यनाथ यांनी त्याची तुलना हाफिज सईदशी केली होती.त्यावर शाहरुख खानच्या सर्मथनार्थ अनुपम खेर पुढे आले आहेत. ट्विटरवर प्रतिक्रिया देताना अनुपम म्हणाले, की भाजपाच्या काही नेत्यांनी भान राखून बोलावं. आपली जीभ आवरावी.शाहरुखविषयी फालतू शेरेबाजी तातडीनं थांबवावी. शाहरुख हा देशातील लोकप्रिय अभिनेता आहे. आम्हाला त्याचा अभिमान वाटतो.