गत सोमवारपासून मुंबईतील ब्रीच कँडी रूग्णालयात उपचार घेत असलेल्या स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्या तब्येतीत सुधारणा असल्याची माहिती कुटुंबाकडून देण्यात आली आहे. त्या लवकरच बºया होऊन घरी परततील, असा विश्वासही कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे. श्वसनाचा त्रास होत असल्याने लतादीदींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. लतादीदींच्या तब्येतीबाबतचे वृत्त कळताच त्यांच्या जगभरातील चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. अशात कुटुंबीयांनी आज दुपारी लता दीदींच्या प्रकृतीसंदर्भातील अपडेट जारी केले. ‘लता दीदींची प्रकृती स्थिर असून त्यांच्या तब्येतीत सुधारणा होत आहे. तुम्हा सर्वांच्या प्रार्थनांसाठी आभार. आम्ही त्यांची प्रकृती उत्तम होण्याची वाट पाहत आहोत, ’असे त्यांच्या कुटुंबाकडून सांगण्यात आले आहे.
Lata Mangeshkar's Health Update : लता मंगेशकर यांची प्रकृती स्थिर, कुटुंबीयांनी दिली माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2019 14:29 IST
Lata Mangeshkar's Health Update : गत सोमवारपासून मुंबईतील ब्रीच कँडी रूग्णालयात उपचार घेत असलेल्या स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्या तब्येतीत सुधारणा असल्याची माहिती कुटुंबाकडून देण्यात आली आहे.
Lata Mangeshkar's Health Update : लता मंगेशकर यांची प्रकृती स्थिर, कुटुंबीयांनी दिली माहिती
ठळक मुद्दे अलीकडेच २८ सप्टेंबर रोजी लतादीदींनी आपला ९० वा वाढदिवस साजरा केला होता.