फिल्मफेअर अवार्ड सोहळयाच्या रेड कार्पेटवर दिसला स्टार्सचा ग्लॅमरस अंदाज!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2018 11:19 IST
६३ व्या फिल्मफेअर अवार्ड सोहळयाचा रंगारंग कार्यक्रम शनिवारी पार पडला. बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी या सोहळ्याला हजेरी लावली. बॉलिवूडच्या अनेक ...
फिल्मफेअर अवार्ड सोहळयाच्या रेड कार्पेटवर दिसला स्टार्सचा ग्लॅमरस अंदाज!
६३ व्या फिल्मफेअर अवार्ड सोहळयाचा रंगारंग कार्यक्रम शनिवारी पार पडला. बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी या सोहळ्याला हजेरी लावली. बॉलिवूडच्या अनेक सौंदर्यवतींनी ग्लॅमरस अवतारात रेड कार्पेटवर एन्ट्री घेतली. मिस वर्ल्ड २०१८ मानुषी छिल्लर हिची या सोहळ्याच्या रेड कार्पेवरील एन्ट्री सर्वाधिक लक्ष्यवेधी ठरली. अभिनेत्री प्रीति झिंटा या सोहळ्याच्या रेड कार्पेटवर आली आणि सगळ्यांच्या नजरा तिच्यावर खिळल्या. प्रीति प्रेग्नंट असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगतेय. पण प्रीतिने या चर्चेला पूर्णविराम दिला. सलमान खानची कथित गर्लफ्रेन्ड युलिया वंतूर अभिनेता मनीष पॉलसह रेड कार्पेटवर दिसली. सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जिंकणारी अभिनेत्री विद्या बालन साड्या रंगाच्या साडीत रेड कार्पेटवर अवतरली. ‘सीक्रेट सुपरस्टार’ या चित्रपटात आईची भूमिका साकारणारी अभिनेत्री मेहर विज हिचा ग्लॅमरस अवतार यावेळी दिसला. अभिनेत्री काजोल मरून रंगाच्या गाऊनमध्ये रेड कार्पेटवर अवतरली आणि सगळ्यांच्या नजरा तिच्यावर खिळल्या. अभिनेत्री नेहा धूपिया यलो गाऊनमध्ये रेड कार्पेटवर अवरतली.