Join us

'ही स्टार किड्स लवकरच सेलिब्रेट करणार आपला पहिला बर्थडे, ओळखा पाहू कोण आहे ती!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2018 12:27 IST

सध्या बॉलिवूडमध्ये स्टारकिड्सची जबरदस्त चर्चा आहे. रोज सोशल मीडियावर कोणत्याना कोणत्या स्टारकिड्सचा फोटो व्हायरल होत असतो. आमच्या हातीसुद्धा अशाच एका स्टारकिड्सचा फोटो लगाला आहे. 

ठळक मुद्देइनाया सध्या फॅंमिलीसोबत व्हॅकेशनवर आहेलवकरच इनाया आपला पहिला वाढदिवस सेलिब्रेट करणार आहे

सध्या बॉलिवूडमध्ये स्टारकिड्सची जबरदस्त चर्चा आहे. रोज सोशल मीडियावर कोणत्याना कोणत्या स्टारकिड्सचा फोटो व्हायरल होत असतो. आमच्या हातीसुद्धा अशाच एका स्टारकिड्सचा फोटो लगाला आहे. 

काहीच दिवसांत हि स्टार किड्स आपला पहिला वाढदिवस सेलिब्रेट करणार आहे. ही दुसरी-तिसरी कोणी नसून तैमूरची बहीण इनाया आहे. सध्या इनाया मम्मी सोहा अली खान आणि पप्पा कुणाल खेमूसोबत व्हॅकेशनवर आहे. सोहा, कुणाल, सैफ अली खान, करिना कपूर मुलांसोबत मालदीवला व्हॅकेशन एन्जॉय करतायेत.    

सोहा अली खानने इनायाचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत 'माय सनशाईन' असे कॅप्शन दिले आहे. इनाया समुद्राच्या काठावर एक टेबलवर बसलेली या फोटोत दिसतेय. येत्या 29 सप्टेंबरला इनाया आपला पहिला वाढदिवस सेलिब्रेट करणार आहे. सोहाची मुलगी इनाया ही तैमूर ऐवढीच क्युट आहे. तिचेही फोटो सोशल मीडियावर तैमूर सारखेच व्हायरल होत असतात. इनाया आणि तैमूरने काही दिवसांपूर्वी रक्षाबंधनदेखील सेलिब्रेट केले. त्याचे फोटोही सोशल मीडियावर चांगले व्हायरल झाले होते. 

 सैफ अली खान लवकरच त्याच्या सिक्रेट गेम्स या वेबसिरिजच्या दुसऱ्या भागाच्या चित्रीकरणाला सुरुवात करणार आहे. या वेबसिरिजचा पहिला सिझन चांगलाच गाजला होता. तसेच बाजार या त्याच्या चित्रपटाचे चित्रीकरण देखील लवकरच सुरू होणार आहे. तर करिना करण जोहरच्या तख्त या चित्रपटात एका महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला ती लवकरच सुरुवात करणार आहे. 

टॅग्स :सोहा अली खानकुणाल खेमू