Join us
Daily Top 2Weekly Top 5

 शाहरुख खानला ‘हिट’ची प्रतीक्षा; पण श्रीराम राघवन यांनीही केली निराशा!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2019 10:42 IST

किंगखान शाहरुख खान याला बॉलिवूडचा ‘किंगखान’ ही ओळख कायम ठेवायची असेल तर एका ‘हिट’ची गरज आहे. सध्या त्याचदिशेने त्याची धडपड सुरु आहे. तूर्तास शाहरूख अनेक मोठ्या दिग्गजांना भेटतो आहे. एका चांगल्या स्क्रिप्टचा शोध घेतोय.

ठळक मुद्देशाहरुखचा अलीकडे आलेला ‘झीरो’ फ्लॉप झाला. या चित्रपटानंतर शाहरूखचे नाव अनेक चित्रपटांशी जोडले गेले. पण अद्याप त्याने कुठल्याही चित्रपटाचे काम सुरु केलेले नाही.

किंगखान शाहरुख खान याला बॉलिवूडचा ‘किंगखान’ ही ओळख कायम ठेवायची असेल तर एका ‘हिट’ची गरज आहे. सध्या त्याचदिशेने त्याची धडपड सुरु आहे. तूर्तास शाहरूख अनेक मोठ्या दिग्गजांना भेटतो आहे. एका चांगल्या स्क्रिप्टचा शोध घेतोय. काही दिवसांपूर्वी एसआरकेने ‘अंधाधुन’चे दिग्दर्शक श्रीराम राघवन यांची भेट घेतली. यानंतर एसआरके व राघवन दोघेही लवकरच हात मिळवणार, असे मानले गेले होते. पण आता राघवन यांनी या चर्चेवरही पूर्णविराम लावला आहे.

होय, मी कुठल्याही स्क्रिप्टसंदर्भात शाहरुखला भेटलेलो नाही. मी त्याला कुठलीही स्क्रिप्ट ऐकवलेली नाही. मी फक्त त्याला भेटायला गेलो होतो. त्याला माझा ‘अंधाधुन’ हा चित्रपट आवडला आणि त्याने मला भेटीचे निमंत्रण दिले. आम्ही खूप गप्पा मारल्या. माझ्याकडे चांगले काही असेल तर मी नक्की तुला ऐकवणार, केवळ एवढेच मी त्याला म्हणालो. आत्तापर्यंत माझ्याकडे एसआरकेचा मोबाईल नंबर नव्हता. आता मला त्याचा नंबर मिळाला आहे. मी आता कधीही त्याच्याशी संपर्क साधू शकतो. मी शाहरूखसोबत नक्की काम करू इच्छितो. पण त्यासाठी मला एक चांगली स्क्रिप्ट शोधावी लागेल, असे राघवन म्हणाले.

शाहरुखचा अलीकडे आलेला ‘झीरो’ फ्लॉप झाला. या चित्रपटानंतर शाहरूखचे नाव अनेक चित्रपटांशी जोडले गेले. पण अद्याप त्याने कुठल्याही चित्रपटाचे काम सुरु केलेले नाही. संजय लीला भन्साळींच्या एका आगामी चित्रपटात शाहरूख दिसणार, अशी तूर्तास चर्चा आहे. पण अद्याप याबाबत कुठलाही अधिकृत खुलासा करण्यात आलेला नाही. शाहरूखच्या नशीबात पुढे काय वाढून ठेवलेय, ते बघूच.

टॅग्स :शाहरुख खान