Join us
Daily Top 2Weekly Top 5

श्रीदेवी यांच्या मैत्रिणीने केला 'हा' महत्त्वपूर्ण खुलासा..

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2018 13:06 IST

श्रीदेवी यांचे पार्थिव मुंबईत आणल्यानंतर अंतिम दर्शनासाठी सेलिब्रेशन क्लबमध्ये सकाळपासून ठेवण्यात आले आहे. तिथे बॉलिवूड सेलिब्रेटी आणि सामान्य लोक ...

श्रीदेवी यांचे पार्थिव मुंबईत आणल्यानंतर अंतिम दर्शनासाठी सेलिब्रेशन क्लबमध्ये सकाळपासून ठेवण्यात आले आहे. तिथे बॉलिवूड सेलिब्रेटी आणि सामान्य लोक त्यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेतो आहे. पिंकी रेड्डी या श्रीदेवींच्या लहानपणीच्या मैत्रिणीने त्यांच्या श्रीदेवींबद्दल काही महत्त्वपूर्ण गोष्टींचा खुलासा केला आहे. पिंकी म्हणाली "श्रीदेवी यांचे जाणे म्हणजे माझ्यासाठी मोठा धक्कादायक आहे. तिच्या जाण्याने मी पूर्णतः खचून गेली आहे.  मी माझ्या बहिणीला गमावले आहे." पिंकी पुढे म्हणल्या, मोहित मारवाहच्या लग्नासाठी दुबई  जायच्या आधी माझे श्रीदेवीशी  बोलणे झाले होते तेव्हा तिला बरे वाटत नव्हते आणि श्रीला थकवा जाणवत होता त्यासाठी ती अँटिबायोटिक्सदेखील घेत होती.पिंकीने सांगितले की माझे बोलणे बोनी कपूरशी झाले ते पूर्णपणे खचून गेले आहेत. श्री आणि बोनी एकमेकांसोबत खूप खूश होते, श्रीच्या निधनानंतर वेगळ्या वेगळ्या बातम्याचा अंदाज बांधणे चुकीचे आहे. श्रीदेवी यांचे ५४ व्या वर्षी निधन झाले. आपल्या कुटुंबीयांसह दुबईत एका लग्न समारंभासाठी गेल्या असताना शनिवारी रात्री त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुली आणि पती बोनी कपूर असे कुटुंब आहे. त्यांच्या आकस्मिक झालेल्या निधनामुळे सिनेसृष्टीत आणि चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे. श्रीदेवी यांनी बॉलिवूडमध्ये अभिनय, सौंदर्य आणि नृत्याविष्काराने स्वतःचा वेगळा असा ठसा उमटवला होता. त्यांनी सदमा, मिस्टर इंडिया, नागिन, लम्हें, इंग्लिश विंग्लिश, मॉम यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या.  श्रीदेवी यांनी बॉलिवूडमध्ये अभिनय, सौंदर्य आणि नृत्याविष्काराने स्वतःचा वेगळा असा ठसा उमटवला होता. त्यांनी सदमा, मिस्टर इंडिया, नागिन, लम्हें, इंग्लिश विंग्लिश, मॉम यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या. बालकलाकार म्हणून श्रीदेवी यांनी चित्रपटसृष्टीत पाय ठेवला होता. त्यांनी वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षी तमिळ चित्रपटात काम केले. १९६७ साली एका मल्याळम चित्रपटातील भूमिकेसाठी त्यांना केरळ सरकारने सर्वोत्कृष्ट बालकलाकार म्हणून गौरवले होते.ALSO READ :  ​मोहित मारवाहच्या लग्नानंतर या कारणासाठी दुबईत थांबल्या होत्या श्रीदेवी...समोर आले खरं कारण