Join us

श्रीदेवीचे मॉस्कोमध्ये फॅमिली व्हेकेशन; मात्र जान्हवीला करीत आहे मिस, पाहा फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2017 16:27 IST

अभिनेत्री श्रीदेवी सध्या मॉस्को येथे फॅमिलीसोबत व्हेकेशन एन्जॉय करीत आहे. त्याचे काही फोटोज् तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी सध्या मॉस्को येथे फॅमिलीसोबत ख्रिसमस सुट्या एन्जॉय करीत आहे. ५४ वर्षीय श्रीदेवीने तिच्या व्हेकेशनचे काही फोटोज् इन्स्टाग्रामवर अपलोड केले असून, त्यामध्ये पती बोनी कपूर आणि मुलगी खुशी बघावयास मिळत आहे. श्रीदेवीची मोठी मुलगी जान्हवी सध्या तिच्या पहिल्या ‘धडक’ या तिच्या पहिल्या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त असल्याने, तिला या व्हेकेशनला जाता आले नाही. त्यामुळे श्रीदेवी मुलगी जान्हवीला खूप मिस करीत आहे. त्यामुळेच श्रीदेवीने शेअर केलेल्या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिले की, ‘मिसिंग जानू’ दरम्यान, श्रीदेवी याठिकाणी सुट्या एन्जॉय करताना तिच्या चित्रपटाचे प्रमोशनही करीत आहे. तिचा अखेरचा ‘मॉम’ हा चित्रपट रूसमध्ये रिलीज होणार आहे. त्याचा प्रीमिअर गेल्या सोमवारीच मॉस्कोमध्ये आयोजित केला होता. प्रीमिअरनंतर श्रीदेवीला चाहत्यांकडून मिळालेल्या प्रतिक्रियानंतर ती खूप खूश आहे. रवि उदयावार दिग्दर्शित हा चित्रपट रूसमध्ये ३० चित्रपटगृहांमध्ये रिलीज होणार आहे. मात्र याठिकाणी या चित्रपटाचे नाव ‘मॉम’ असे नसून, ‘मामा’ असणार आहे. श्रीदेवी पती बोनी कपूर आणि लहान मुलगी खुशी हिच्यासोबत याठिकाणी पोहोचली आहे. भारताचे राजदूत पंकज सरन यांनी चित्रपटाच्या प्रीमिअरप्रसंगी आलेल्या लोकांचे स्वागत केले. प्रीमिअरचे आयोजन एका प्रीमिअर थिएटरमध्ये करण्यात आले होते. त्यामुळे प्रीमिअरसाठी काही रुसी प्रतिनिधी आणि चित्रपट चाहत्यांसह ४०० लोक उपस्थित होते. याविषयी श्रीदेवीने म्हटले की, ‘चित्रपटाच्या प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया ऐकून समाधान वाटत आहे. प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया ऐकून असे वाटत आहे की, मी हे पहिल्यांदा तर बघत नाही ना?’ दरम्यान, रुसमध्ये ३० वर्षांनंतर श्रीदेवीचा चित्रपट रिलीज होत आहे. त्याअगोदर ‘मिस्टर इंडिया’ हा चित्रपट याठिकाणी रिलीज झाला होता.