Join us
Daily Top 2Weekly Top 5

​श्रीदेवी मृत्यूप्रकरणी चाहत्याची चौकशीची मागणी! हायकोर्टाने याचिका फेटाळली, आता सुप्रीम कोर्टात जाण्याची तयारी!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2018 10:21 IST

श्रीदेवी यांचे निधनाच्या इतक्या दिवसानंतरही बॉलिवूडची ही ‘चांदनी’ आपल्यात नाही, यावर चाहत्यांचा विश्वास बसत नाहीयं. एका चाहत्याला तर श्रीदेवींच्या ...

श्रीदेवी यांचे निधनाच्या इतक्या दिवसानंतरही बॉलिवूडची ही ‘चांदनी’ आपल्यात नाही, यावर चाहत्यांचा विश्वास बसत नाहीयं. एका चाहत्याला तर श्रीदेवींच्या निधनाचा इतका मोठा धक्का बसलायं की, त्याने या प्रकरणाच्या चौकशीची मागणी करत, दिल्ली उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. सुनील सिंह असे या चाहत्याचे नाव आहे. अर्थात दिल्ली उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली आहे. पण सुनील सिंह यांनी अद्यापही हार मानलेली नाही. आता त्यांनी याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात जाण्याची तयारी सुरू केली आहे.ज्या स्थितीत श्रीदेवींचा दुबईत मृत्यू झाला, तो संदिग्ध आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी व्हावी, अशी मागणी सुनील सिंह यांनी आपल्या याचिकेत केली आहे. श्रीदेवींचा मृत्यू झाला, त्यादिवशी मी दुबईत होतो. मित्रांकडून मला त्यांच्या मृत्यूची बातमी मिळाली. मी लगेच श्रीदेवी थांबल्या होत्या त्या हॉटेलात आणि श्रीदेवींना नेले होते त्या रूग्णालयात गेलो. हॉटेलच्या लोकांशी बोलताना, रूग्णालयात हलवण्यात आले, तोपर्यंत श्रीदेवी जिवंत होत्या, असे मला कळले. पण त्यांचे पती बोनी कपूर यांनी श्रीदेवींना रूग्णालयात नेले नाही, असे  सुनील यांनी आपल्या याचिकेत म्हटले आहे. एवढेच नाही तर दुबईतील भारतीय दूतावासाबद्दलही सवाल उपस्थित केले आहेत. दुबई पोलिसांनी या मृत्यूप्रकरणी संशय व्यक्त केला होता. पण भारतीय दूतावासाच्या हस्तक्षेपानंतर घाईघाईत ही केस बंद करण्यात आली, असे  त्यांनी याचिकेत नमूद केले आहे.ALSO READ : ​ श्रीदेवीची लहान मुलगी खुशी कपूर हिने घेतला मोठा निर्णय!!दरम्यान दुबई पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला आहे. त्यामुळे उच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपाची गरज नाही, असे सांगत दिल्ली उच्च न्यायालयाने संबंधित याचिका फेटाळून लावली आहे. गत २४ फेब्रुवारीला दुबईच्या एका हॉटेलात श्रीदेवींनी अंतिम श्वास घेतला. बोनी कपूर यांचा भाचा मोहित मारवाह याच्या विवाहासाठी श्रीदेवी दुबईला गेल्या होत्या.  हॉटेलमधील बाथटबमध्ये बुडून त्यांचा मृत्यू झाला. सुमारे अडीच दिवसांच्या चौकशीनंंतर दुबई पोलिसांनी पार्थिव कुटुंबीयांकडे सोपवले होते. यानंतर २८ फेबु्रवारीला श्रीदेवींच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.