श्रीदेवींचे पार्थिव भारतात येण्यास होऊ शकतो विलंब! प्रकरणातील गुंता वाढला!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2018 10:10 IST
अभिनेत्री श्रीदेवी यांचे पार्थिव भारतात आणण्यास विलंब होत आहे. सोमवारी मध्यरात्रीपर्यंत त्यांचे पार्थिव मुंबईत आणले जाईल, असे सांगण्यात येत ...
श्रीदेवींचे पार्थिव भारतात येण्यास होऊ शकतो विलंब! प्रकरणातील गुंता वाढला!!
अभिनेत्री श्रीदेवी यांचे पार्थिव भारतात आणण्यास विलंब होत आहे. सोमवारी मध्यरात्रीपर्यंत त्यांचे पार्थिव मुंबईत आणले जाईल, असे सांगण्यात येत होते. मात्र कालच आलेल्या श्रीदेवी यांच्या पोस्टमार्टम रिपोर्टमुळे गुंता वाढल्याने चित्र अस्पष्ट आहे. दरम्यान दुबईतील भारतीय राजदूत नवदीप सूरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय दूतावास श्रीदेवी यांचे पार्थिव मिळण्यासाठी ‘क्लीअरन्स’च्याप्रतीक्षेत आहेत. अर्थात कुठल्या प्रकारच्या क्लीअरन्सची प्रतीक्षा आहे, हे मात्र त्यांनी स्पष्ट केले नाही. दुबईच्या हॉटेलात बाथटबमध्ये बुडून श्रीदेवी यांचा मृत्यू झाल्याचे पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये उघड झालेले आहे. त्यांच्या शरीरात अल्कोहोलचे अंशही सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर दुबई पोलिस या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत आहेत. त्यामुळे श्रीदेवींचे पार्थिव ताब्यात मिळण्यास आणखी विलंब होऊ शकतो. आज मंगळवारी श्रीदेवींचे पार्थिव भारतात येऊ शकते, असे मानले जात आहे. अर्थात अद्यापही यासंदर्भात निश्चित माहिती मिळू शकली नाही. मुंबईत श्रीदेवींचे लाखो चाहते, त्यांच्या अंतिम दर्शनाची प्रतीक्षा करत आहेत. श्रीदेवींचे पार्थिव भारतात आल्यानंतर ते त्यांच्या ‘भाग्य’बंगल्यात अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येईल, असे कळतेय.बोनी कपूर यांना दुबई सोडण्यास मनाईश्रीदेवी ज्या हॉटेलात उतरल्या होत्या त्या दुबईतील अमिरात टॉवरच्या कर्मचाºयांची तसेच श्रीदेवींच्या कुटुंबीयांची दुबई पोलिसांनी चौकशी चालवली आहे.याच हॉटेलच्या २२०१ क्रमांकाच्या रूममध्ये श्रीदेवी यांचे निधन झाले. सूत्रांच्या मते, बोनी कपूर यांना दुबई सोडून जाण्यास मनाई करण्यात आली आहे. दुबई पोलिसांनी बोनी कपूर यांची अनेक तास चौकशी केल्याचे कळतेयं. अर्थात या वृत्ताला अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही. प्रारंभी हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचे निधन झाल्याचे सांगण्यात आले होते. मात्र पोस्टमार्टम रिपोर्टनंतर या प्रकरणाला वेगळेच वळण मिळाले. दुबई पोलिसांनी हे प्रकरण ‘पब्लिक प्रॉसिक्यूशन’कडे सोपवले आहे. ALSO READ : श्रीदेवीच्या मृत्यूप्रकरणाला मिळाले नवे वळण, हृदयविकाराच्या धक्क्याने नव्हे तर या कारणामुळे झाले श्रीदेवी यांचे निधनकॉल्स डिटेल्स पडताळणीश्रीदेवींनी आपल्या अखेरच्या ४८ तासांत कुणाकुणाला कॉल्स केलेत, याचा तपास दुबई पोलिस करत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एका खास क्रमांकावरून श्रीदेवींना बहुतांश कॉल्स केले गेलेत. त्याच क्रमांकाचा शोध दुबई पोलिस घेत आहेत.