Join us

बॉलिवूडच्या 'या' दिग्दर्शिकाच्या चित्रपटात काम करणार होत्या श्रीदेवी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2018 17:22 IST

जेव्हा पासून श्रीदेवी यांच्या मृत्यूची बातमी आली आहे तेव्हापासून मीडिया असो किंवा त्यांचे फॅन्स सगळेजण धक्यात आहेत.   वयाच्या ५४ ...

जेव्हा पासून श्रीदेवी यांच्या मृत्यूची बातमी आली आहे तेव्हापासून मीडिया असो किंवा त्यांचे फॅन्स सगळेजण धक्यात आहेत.   वयाच्या ५४ व्या वर्षी त्या कशा काय जगाचा निरोप घेऊ शकते हेच कोणाला समजत नाहीय. त्यांच्या जाण्याने बॉलिवूडमध्ये शोकाकुल वातावरण पसरले आहे. बॉलिवूड लाईफच्या रिपोर्टनुसार करण जोहरने 'ए दिल है मुश्कील'नंतर  शीधत नावाचा चित्रपट करणार होता ह्या चित्रपटासाठी तो श्रीदेवी यांना घेण्याच्या विचार करत होता. त्याने ह्याबद्दल श्रीदेवींशी चर्चा देखील केली होती. सूत्रांनुसार श्रीदेवी सुद्धा करणच्या या चित्रपटाला घेऊन फारच उत्सुक होत्या. मिळालेल्या माहितीनुसार श्रीदेवींनी शीधत ह्या चित्रपटाला घेऊन करणशी चर्चा देखील केली होती. ह्यात श्रीदेवी यांची महत्त्वाची भूमिका होती. करण जोहला श्रीदेवी यांनी ह्या चित्रपटात ग्लॅमरस अंदाजात दाखवायचे होते पण करणचे हे स्वप्न अधुरेच राहिले. श्रीदेवी यांनी गौरी शिंदेच्या इंग्लिश विंग्लिश चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक केले होते. प्रेक्षकांना हा चित्रपट फार आवडला होता. त्यानंतर श्रीदेवी यांनी मॉम सारखा संवेदनशील चित्रपट देखील काम केला होते. त्यात तिच्या अभिनयाचे कौतुक झाले होते. शाहरुख खानच्या "झिरो" या चित्रपटात देखील त्यांनी अभिनय केला आहे. श्रीदेवी यांनी काही महिन्यांपूर्वी या चित्रपटाचे शूटिंग संपवले होते. बिग बी अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करण्यासाठी श्रीदेवी यांनी १ कोटी रुपये मानधन मागितलं होतं. ९०च्या दशकात नायिकेने मानधनासाठी अशाप्रकारे रोखठोक भूमिका घेणे कठीण होतं. मात्र अभिनेत्यांच्या तुलनेत श्रीदेवी यांनी स्वतःला कधीच कमी समजलं नाही.कोट्यवधीचे मानधन घेणा-या श्रीदेवी यांचा खर्चसुद्धा तितकाच होता. स्वतःला मेंटेन ठेवण्यासाठी त्या दिवसाला २५ लाख रुपये खर्च करायच्या असंही बोललं जातं.श्रीदेवी या सौंदर्याची खाण होत्या. हेच सौंदर्य टिकून रहावं यासाठी त्या खूप काळजी घ्याच्या. महागड्या ब्युटी पार्लरला जाणं, महागडी सौंदर्य प्रसाधनं वापरणं, महागडे कपडे, महागड्या साड्या, महागडे बूट असे राजेशाही शौक श्रीदेवी यांना होते. त्यासाठी त्या आपल्या कमाईतील लाखो रुपये दिवसाला खर्च करायच्या. इतकंच नाही तर त्यांचे हे महागडे शौक पूर्ण करण्यासाठी श्रीदेवी यांचे पती बोनी कपूर यांना एकदा नोकरीही करावी लागली होती असंही बोललं जात असे. परदेशात फिरण्याचीही श्रीदेवी यांना हौस होती. मात्र परदेशात लग्न सोहळा आणि त्यानंतर फिरण्यासाठी गेले असताना श्रीदेवी यांचा मृत्यू व्हावा ही मोठी शोकांतिकाच म्हणावी लागेल.