श्रीदेवी जगातील सर्वाधिक दु:खी महिला होती ...! राम गोपाल वर्मा यांनी लिहिली भावूक करणारी पोस्ट!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2018 15:39 IST
बॉलिवूडचे दिग्दर्शक रामगोपाल वर्मा श्रीदेवी यांच्या अकाली निधनाच्या धक्क्यातून अद्यापही सावरू शकलेले नाहीत. श्रीदेवींना ते फार जवळून ओळखायचे. फेसबुकवर ...
श्रीदेवी जगातील सर्वाधिक दु:खी महिला होती ...! राम गोपाल वर्मा यांनी लिहिली भावूक करणारी पोस्ट!!
बॉलिवूडचे दिग्दर्शक रामगोपाल वर्मा श्रीदेवी यांच्या अकाली निधनाच्या धक्क्यातून अद्यापही सावरू शकलेले नाहीत. श्रीदेवींना ते फार जवळून ओळखायचे. फेसबुकवर श्रीदेवींच्या चाहत्यांना उद्देशून लिहिलेल्या एका खुल्या पत्रात त्यांनी श्रीदेवींबद्दलच्या अनेक आठवणी लिहिल्या आहेत. श्रीदेवी या जगातील सर्वाधिक दु:खी महिला होती, असे त्यांनी यात लिहिले आहे.‘श्रीदेवी एक हरहुन्नरी अभिनेत्री होती. बॉलिवूडची पहिली सुपरस्टार होती. पण तिच्या आयुष्याचा हा केवळ एक पैलू होता. अनेकांसाठी तिचे आयुष्य परफेक्ट होते. सुंदर चेहरा, प्रतिभा, दोन सुंदर मुलींसह हसते खेळते कुटुंब...बाहेरून सगळे असे सुंदर दिसायचे. पण वास्तव याच्या विपरित होते. ‘क्षण क्षणम’ या चित्रपटापासून मी श्रीदेवीला ओळखतो. पित्याच्या मृत्यूपर्यंत तिचे आयुष्य आकाशात उडणाºया एखाद्या स्वतंत्र पक्ष्यासारखे होते. पण यानंतर हा पक्षी बंदिस्त झाला. आई श्रीदेवीच्या सुरक्षेबद्दल कमालीची चिंतीत असायची. यामुळे पिंजºयात कैद असलेल्या पक्षासारखी श्रीदेवीची अवस्था झाली. इनकम टॅक्सच्या धाडीच्या भीतीने श्रीदेवीच्या कमाईचा पैसा वडिलांनी आपले काही मित्र व नातेवार्इंकाना ठेवायला दिला. पण त्यांच्या निधनानंतर सगळ्यांनी श्रीदेवीला धोका दिला. यानंतर श्रीदेवीच्या आईने कायद्याच्या कचाट्यात अडकलेली संपत्ती सोडवण्यासाठी तिचा सगळा पैसा वापरला. एकवेळ अशी आली की, श्रीदेवी एका एका पैशासाठी मोताद झाली. याकाळात तिच्या आयुष्यात बोनी आला. बोनी स्वत:ही कर्जात होता. मृत्युपूर्वी सगळी प्रॉपर्टी आईने श्रीदेवीच्या नावावर केली. पण आईच्या मृत्यूनंतर श्रीदेवीच्या बहिणीने संपत्तीत अर्धा वाटा मागत केस ठोकली. याकाळात श्रीदेवी एकटी होती. बोनीशिवाय तिला दुसरा कुणाचाही आधार नव्हता. आयुष्यात श्रीदेवी अनेक अडचणीतून गेली. बोनीच्या आईने, समाजाने तिला घर तोडणारी ठरवले. तिला कधीच शांती लाभली नाही. एका महिलेच्या शरिरात कैद असलेल्या मुलासारखी ती होती. व्यक्ती म्हणून ती निष्पाप होती. पण अनेक वाईट अनुभवांमुळे ती मनातून पार कोमेजली होती. जिवंत असताना तिला कधीच शांती लाभली नाही. ती जगातील सर्वाधिक दु:खी महिला होती, असे रामगोपाल वर्मा यांनी लिहिले आहे.