Join us
Daily Top 2Weekly Top 5

वयाच्या पन्नाशीत श्रीदेवींनी केले होते BOLD फोटोशूट, सोशल मीडियावर माजली होती खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2020 16:22 IST

Photos Get Viral : एक किस्सा फोटोशूटचा...

ठळक मुद्देपहिली सुपरस्टार अभिनेत्री अशी त्यांची बॉलिवूडमध्ये ओळख होती.

बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी आज आपल्यात नाहीत. मात्र मोठ्या पडद्यावरील त्यांचा जबरदस्त अभिनय, त्यांनी साकारलेल्या भूमिका कोणीही विसरू शकत नाही. आपल्या दमदार अ‍ॅक्टिंगच्या जोरावर श्रीदेवींनी असा काही दबदबा निर्माण केला होता की, बडे बडे स्टार्स त्यांच्यासोबत काम करताना घाबरत. श्रीदेवी यांच्या अनेक कथा, कहाण्या, किस्से आहेत. एक असाच किस्सा त्यांनी वयाच्या 50 व्या वर्षी केलेल्या बोल्ड फोटोशूटचाही आहे. पन्नाशीच्या श्रीदेवींनी केलेल्या या फोटोशूटमुळे अनेक जण थक्क झाले होते. श्रीदेवींच्या या फोटोशूटचे फोटो पुन्हा एकदा व्हायरल होत आहेत.श्रीदेवींनी वोग इंडिया या मॅगझिनसाठी हे फोटोशूट केले होते. त्यांचे फोटो पाहून मोठमोठ्या यंग हिरोईन्सलाही घाम फुटला होता.यात श्रीदेवींना अतिशय ग्लॅमस व बोल्ड अवतार पाहायला मिळाला होता.

श्रीदेवींचे वय 50 वर्षे आहे, यावरही अनेकांचा विश्वास बसला नव्हता.

सिडक्टिव टीचर अशी या फोटोशूटची थीम होती.

पेन्सिल स्कर्टपासून तर शॉर्ट्स व ब्लेजरमध्ये श्रीदेवींनी यासाठी ग्लॅमरस पोज दिल्या होत्या.

स्टुडंटसोबत फ्लर्टी अंदाजात पोज देणा-या श्रीदेवींचा अवतार अनेकांना भावला होता.

श्रीदेवी त्यांच्या लूक आणि मेकअपची सर्वाधिक काळजी घ्यायच्या. त्या आपल्या त्वचेचीही फार काळजी घ्यायच्या. एवढंच काय तर एअरपोर्ट लूकचाही त्या फार विचार करायच्या.

श्रीदेवी यांना कोणत्याही कार्यक्रमाला जाण्यापूर्वी तयारी करायला तासन तास लागायचे. पण तयारी केल्यानंतर जेव्हा त्या कार्यक्रमाला जायच्या तेव्हा तिथे उपस्थित सा-यांची नजर फक्त त्यांच्यावरच खिळलेली असायची.  

पहिली सुपरस्टार अभिनेत्री अशी त्यांची बॉलिवूडमध्ये ओळख होती. श्रीदेवी यांना साड्यांचे फार वेड होतं. जगभरात कुठेही गेल्या तर तिकडून स्वत:साठी एक साडी नक्कीच घेऊन यायच्या. अनेक महत्त्वाच्या कार्यक्रमांमध्ये त्या साडी नेसूनच जायच्या. श्रीदेवी यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, बोनी जेव्हाही श्रीदेवी यांना त्यांच्या वयाची आठवण करून देतात, तेव्हा त्यांना फार राग यायचा आणि त्या बोनीसोबत भांडायच्याही. 

टॅग्स :श्रीदेवी