Join us

श्रीदेवी यांच्या व्हायरल होत असलेल्या पार्थिवाच्या फोटोचे खरे वास्तव आले समोर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2018 19:34 IST

दुबईमध्ये श्रीदेवी यांच्या अकाली निधनानंतर आज रात्री उशिरापर्यंत त्यांचे पार्थिव मुंबईला आणले जाण्याची शक्यता आहे. श्रीदेवी यांचे शनिवारी रात्री ...

दुबईमध्ये श्रीदेवी यांच्या अकाली निधनानंतर आज रात्री उशिरापर्यंत त्यांचे पार्थिव मुंबईला आणले जाण्याची शक्यता आहे. श्रीदेवी यांचे शनिवारी रात्री निधन झाल्याची बातमी समोर आल्यानंतर त्यांच्या अंत्यदर्शनाची अनेकांना प्रतीक्षा आहे. याचदरम्यान रविवारी त्यांच्या पार्थिवाचा एक फोटो इंटरनेटवर व्हायरल झाला होता, मात्र तो फोटो खरा की खोटा याविषयी तर्कवितर्क असल्याने अनेकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. मात्र आता या फोटोचे वास्तव समोर आले असून, ते जाणून तुम्हाला धक्का बसण्याची शक्यता आहे. होय, जर तुम्ही इंटरनेटवर श्रीदेवी यांच्या पार्थिवाचा फोटो बघितला असेल तर अगोदर तुम्ही ही बातमी वाचायला हवी. कारण ही बातमी वाचून तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. कारण श्रीदेवी यांच्या नावे व्हायरल होत असलेला फोटो त्यांचा नसून, दुसºयाचा आहे. आतापर्यंत श्रीदेवीचा अंतिम फोटो माध्यमांमध्ये येऊ शकला नाही. त्यामुळे अशाप्रकारचा फोटो शेअर करू नये असे आवाहन केले जात आहे.  श्रीदेवी यांचे दुबईतील एका हॉटेलमध्ये निधन झाल्यानंतर त्यांना दुबईच्या राशिद रुग्णालयात नेण्यात आले होते. याविषयी हॉटेल स्टाफने काहीही सांगण्यास स्पष्ट शब्दात नकार दिला होता. दुबई पोलिसांनीदेखील याप्रकरणी कमालीची गुप्तता पाळताना संपूर्ण चौकशी झाल्यानंतरच श्रीदेवी यांचे पार्थिव कुटुंबीयांकडे सोपविले. श्रीदेवी यांचे हजारो चाहते दुबईमध्ये असून त्यांनादेखील श्रीदेवी यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घ्यायचे होते. परंतु पोलिसांनी याप्रकरणी गुप्तता पाळली.  मीडिया रिपोर्ट्सनुसार, बोनी कपूर यांनी श्रीदेवी यांचे पार्थिव सर्वात अगोदर बघितले. ज्यानंतर त्यांनी हॉटेल स्टाफच्या मदतीने श्रीदेवी यांचे पार्थिव रुग्णालयात हलविले. डॉक्टरांनी तपासल्यानंतर त्यांना मृत घोषित केले होते.