Join us
Daily Top 2Weekly Top 5

Spotted : इलियाना डिक्रुज भाजी घ्यायला आली, कुणी नाही पाहिले… ना भाजीवाला ना फॅन्सनी काढला सेल्फी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2018 21:00 IST

यावेळी जेव्हा फोटोग्राफर इलियानाच्या जवळ पोहोचले तेव्हाभाजी खरेदी करण्यात तिला कसलाही कमीपणा वाटला नाही. विशेष बाब म्हणजे, अनेक सिनेमांमधून लोकप्रिय झालेल्या इलियानासोबत ना भाजीवाला आणि ना सामान्य माणसाने सेल्फी काढला.

सेलिब्रिटींसह फोटा काढावा, त्यांच्यासह सेल्फी असावा,ऑटोग्राफ घ्यावा किंवा मग एक झलक तरी पाहायला मिळावी अशी फॅन्सची इच्छा असते. मात्र सध्या सोशल मीडियावर असे फोटो व्हायरल झाले आहेत. ज्यात एक अभिनेत्री मुंबईच्या रस्त्यावर फिरते आहे. मात्र तिला कुणीच ओळखलं नाही. अभिनेत्री इलियाना डिक्रुज हिचे हे फोटो आहेत. रुस्तम', 'रेड' अन् 'बर्फी' यासारख्या सिनेमात काम केलेली इलियाना मुंबईच्या रस्त्यावर भाज्या खरेदी करताना दिसत आहे. इलियाना एकटीच इथे भाजीविक्रेत्यांशी मोलभाव करत असल्याचे फोटो पाहताच समजतंय. 

यावेळी जेव्हा फोटोग्राफर इलियानाच्या जवळ पोहोचले तेव्हाभाजी खरेदी करण्यात तिला कसलाही कमीपणा वाटला नाही. विशेष बाब म्हणजे, अनेक सिनेमांमधून लोकप्रिय झालेल्या इलियानासोबत ना भाजीवाला आणि ना सामान्य माणसाने सेल्फी काढला. इलियाना गेल्या अनेक वर्षांपासून एका गंभीर आजाराचा सामना करते आहे. ती बॉडी डिस्मॉर्फिया नावाच्या आजाराने पीडित आहे. या आजारात शरीराचा शेप बिघडतो. ज्यामुळे शरीराचा आकार वेगळा दिसायला लागतो. इलियानाच्या कमरेखालचे शरीर थोडे मोठे आहे.

ती ते सैल कपड्यांमध्ये लपवते. या आजारामुळेच ती नैराश्यात गेली होती आणि तिने आत्महत्येचा प्रयत्नही केला होता. इलियानाने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर आपला एक फोटो पोस्ट केला होता. याच्या कॅप्शनमध्ये तिने क्रेडिट ब्वॉयफ्रेंड अँड्रयू निबोनला देताना तो हबी म्हणजेच हसबंड असल्याचे नमूद केले होते. इलियानाच्या या पोस्टनंतर इलियानाने अँड्रयूशी गुपचूप लग्न केल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र यावर  दोघांकडून यावर आतापर्यंत कोणतेही स्पष्टीकरण आलेले नाही.

टॅग्स :इलियाना डीक्रूज