Spoof Video : अखिलेश यादव यांच्या ‘डॉन-२’चा ट्रेलर तुम्ही बघितला काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2017 12:40 IST
उत्तर प्रदेशात होत असलेली विधानसभा निवडणूक एखाद्या अॅक्शन पॅक्ड हिंदी सिनेमापेक्षा कमी नाही. कारण या निवडणुकीत असे काही आरोप-प्रत्यारोप होत आहेत की, ज्यामुळे एखाद्या हिंदी सिनेमाची शूटिंग तर सुरू नाही ना? असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही.
Spoof Video : अखिलेश यादव यांच्या ‘डॉन-२’चा ट्रेलर तुम्ही बघितला काय?
उत्तर प्रदेशात होत असलेली विधानसभा निवडणूक एखाद्या अॅक्शन पॅक्ड हिंदी सिनेमापेक्षा कमी नाही. कारण या निवडणुकीत असे काही आरोप-प्रत्यारोप होत आहेत की, ज्यामुळे एखाद्या हिंदी सिनेमाची शूटिंग तर सुरू नाही ना? असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. मात्र आपल्या देशात एवढ्या नाटकीय घडामोडी घडत असताना, त्यावर अद्यापपर्यंत काही कलाकारी केली नसेल तरच नवल. काही बहाद्दरांनी यूपीतील हे नाट्य अगदी तंतोतंत हेरून त्याला बॉलिवूड रंग दिला आहे. बॉलिवूडचा किंग शाहरूख खान याच्या ‘डान-२’ च्या ट्रेलरमध्ये चक्क अखिलेश यादव डॉनच्या भूमिकेत डायलॉग मारताना दिसत आहेत. अर्थात हे ट्रेलर एक स्पूफ आहे. या ट्रेलरने यूपीच्या निवडणुकीत असे काही रंग भरले आहेत की, ज्यामुळे सध्या हा व्हिडीओ सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे. सध्या हे ट्रेलर यू-ट्यूबवर ‘अखिलेश-२’ या नावाने ट्रेंड करत आहे. ट्रेलरमध्ये अखिलेश ११ मार्च रोजी दमदार विजय मिळवून परतणार असल्याची घोषणा करताना बघावयास मिळत आहेत. जो मतमोजणीचा दिवस आहे. १५ फेब्रुवारी रोजी अपलोड करण्यात आलेल्या या व्हिडीओला आतापर्यंत १.९० लाख लोकांनी बघितले आहे. दोन मिनिटांपेक्षाही कमी असलेल्या या व्हिडीओमध्ये अखिलेश यादव यांचे इंटरव्ह्यू, भाषणे आणि शाहरुख खानचे डायलॉग असलेल्या क्लिप्स बघावयास मिळत आहे. याव्यतिरिक्त ट्रेलरमध्ये प्रियंका चोपडाच्या रोमा या भूमिकेला बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांचा आवाज देण्यात आला आहे, तर दिवंगत अभिनेता ओम पुरीच्या विशाल मलिक या पोलीस आॅफिसरच्या भूमिकेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी दिसत आहेत. व्हिडीओच्या अखेरीस अखिलेश यादव म्हणतात की, ‘मैंने सोचा, जाते-जाते कुछ अच्छा काम करता जाऊं, मगर तुम लोगोंने मुझे बदलने का मौका नहीं दिया’ अखिलेश यांचा हा डायलॉग ऐकून एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल ती म्हणजे अखिलेश यामध्ये अॅक्शन स्टारच्या भूमिकेत आहेत. त्यामुळे हाय स्पीड कार आणि फ्लाइट क्रायसेसचे अॅक्शन स्टंटही यात दाखविण्यात आले आहे. व्हिडीओमध्ये नोटाबंदीचाही उल्लेख केलेला आहे. अखिलेश यांचा बॉलिवूडशी नेहमीच जवळचा संबंध राहिला आहे. त्यामुळे हा व्हिडीओ त्यांच्या इमेजला साजेशा असल्याचे बोलले जात असल्याने नेटिझन्स व्हिडीओ बघण्याचा आनंद घेत आहेत. आता अखिलेश विजयश्री घेऊन परतणार की त्यांची घोषणा या फिल्मी व्हिडीओ पुरतीच मर्यादित राहणार हे येत्या काळात स्पष्ट होईलच.