Join us
Daily Top 2Weekly Top 5

​खास महिला दिनी ‘की अ‍ॅण्ड का’चे ‘साँग रिलीज’

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2016 08:21 IST

चित्रपटांच्या प्रमोशनसाठी वेगवेगळे फंडे आजमावणाºया बॉलिवूडने उद्या ८ मार्चला साजरा होणारा आंतरराष्ट्रीय महिला दिनही ‘कॅच’ केला आहे. महिला दिनाच्या ...

चित्रपटांच्या प्रमोशनसाठी वेगवेगळे फंडे आजमावणाºया बॉलिवूडने उद्या ८ मार्चला साजरा होणारा आंतरराष्ट्रीय महिला दिनही ‘कॅच’ केला आहे. महिला दिनाच्या मुहूर्तावर मुंबईच्या एका पंचतारांकित हॉटेल करिना कपूर आणि अर्जून कपूर यांचा चित्रपट ‘की अ‍ॅण्ड का’चे ‘मोस्ट वॉन्टेट मुंडा’ हे गाणे रिलीज केले जाणार आहे. रिलीज होणारे या चित्रपटाचे तिसरे गीत असेल. मात्र यावेळी काहीशा वेगळ्या अंदाजात ते रिलीज होत आहे. या रिलीजवेळी सर्वत्र केवळ आणि केवळ महिलाच असतील. चित्रपटाच्या क्रिएटीव्ह टीमने अनेक विचारांती अशा आगळ्यावेगळ्या रूपात हे गाणे रिलीज करण्याचा निर्णय घेतला. व्वा भाई, मान गयें टीम क्रिएटीव्ह...!!