वाणी करणार 'बेफिक्रे'
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2016 10:32 IST
सु शांत सिंह राजपुत सोबत 'शुद्ध देसी रोमांस' करणारी अभिनेत्री वाणी कपूर एका मोठय़ा ब्रेकनंतर पुन्हा हिंदी चित्रपटात काम ...
वाणी करणार 'बेफिक्रे'
सु शांत सिंह राजपुत सोबत 'शुद्ध देसी रोमांस' करणारी अभिनेत्री वाणी कपूर एका मोठय़ा ब्रेकनंतर पुन्हा हिंदी चित्रपटात काम करण्यासाठी सज्ज आहे. 'शुद्ध देसी रोमान्स' मध्ये काही बोल्ड सीन करणार्या वाणीच्या अभिनयाचे चांगलेच कौतुक झाले होते. यानंतर तिने 'आहा कल्याणम' हा तामिळ चित्रपट केला. यशराज बॅनर द्वारे बॉलीवुड मध्ये पदार्पण करणार्या वाणीची आता आदित्य चोप्राच्या 'बेफिक्रे 'मध्ये वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे. या चित्रपटात रणवीर सिंह काम करणार हे निश्चित झाले असून नायिकेची निवड होणे बाक ी आहे. वाणीची निवड जवळपास निश्चित असून ऑफिशियल शिक्कामोर्तब होणे बाकी असल्याचे सूत्रांनी सांगितले.