Join us

​साऊथचे कॉमेडीयन गुंडू हनुमंथ राव यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2018 15:10 IST

आपल्या अनोख्या विनोदी शैलीने प्रेक्षकांना खळखळून हसवणारे दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीचे अभिनेते गुंडू हनुमंथ राव यांचे आज सोमवारी पहाटे दीर्घ ...

आपल्या अनोख्या विनोदी शैलीने प्रेक्षकांना खळखळून हसवणारे दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीचे अभिनेते गुंडू हनुमंथ राव यांचे आज सोमवारी पहाटे दीर्घ आजाराने निधन झाले. हैदराबादेतील राहत्या घरी पहाटे साडे तीनच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ६१ वर्षांचे होते. त्यांच्यामागे एक मुलगा आहे. हृदय आणि किडनीच्या आजाराने ग्रासलेल्या गुंडू यांच्यावर एका रूग्णालयात उपचार सुरु होते.गुंडू यांनी साऊथच्या सुमारे ४०० वर चित्रपटांत काम केले. तिनदा राज्यस्तरीय नंदी पुरस्काराने गौरविण्यात आलेले गुंडू राव यांना ‘अमृथम’ या मालिकेने प्रचंड लोकप्रीय मिळवून दिली. या मालिकेने त्यांचे नाव घराघरात पोहोचले. १९८७ मध्ये त्यांनी आपल्या फिल्मी करिअरला सुरूवात केली. ‘अहा ना पेलांथा’ हा त्यांचा पहिला चित्रपट. प्रियरूकी सुभाषलेखा, रोजंददुडू गजेंद्रराडू, जोडी नंबर१, नेनू सेतामहलक्ष्मी, हाईस्कूल,कोथोक विठ्ठा हे त्यांचे गाजलेले चित्रपट.रंगभूमी कलाकार अशीही त्यांची ओळख होती. वयाच्या १८ व्या वर्षी ‘रावण ब्राह्मा’ हे त्यांचे रंगभूमीवरचे पहिले नाटक़ अभिनयसृष्टीत येण्याआधी गुंडू राव यांचा मिठाईचा व्यवसाय होता. २०१४ मध्ये  त्यांनी तेलगू देसम पार्टीने काढलेल्या रॅलीत सहभाग नोंदवला. आपल्या विनोदी शैलीने या रॅली त्यांनी चांगल्याच गाजवल्या.