'बाहुबली' सिनेमाला टक्कर देण्याचे एका दाक्षिणात्य सुपरस्टारनं उचललं शिवधनुष्य,'सूर्यपुत्र कर्ण' बनून अवतरणार रुपेरी पडद्यावर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2018 12:30 IST
दाक्षिणात्य सिनेमात जे काही असते ते भव्यदिव्य असते हे सा-यांनाच माहिती आहे.दाक्षिणात्य सिनेमाचा विषय,सेट्स, अॅक्शन सीन्स,गाणी सारं सारं काही ...
'बाहुबली' सिनेमाला टक्कर देण्याचे एका दाक्षिणात्य सुपरस्टारनं उचललं शिवधनुष्य,'सूर्यपुत्र कर्ण' बनून अवतरणार रुपेरी पडद्यावर
दाक्षिणात्य सिनेमात जे काही असते ते भव्यदिव्य असते हे सा-यांनाच माहिती आहे.दाक्षिणात्य सिनेमाचा विषय,सेट्स, अॅक्शन सीन्स,गाणी सारं सारं काही डोळे दिपवणारं असंच असते.त्यामुळे बॉलिवूडलाही दाक्षिणात्य सिनेमाची भुरळ पडली आहे.अनेक दाक्षिणात्य सिनेमांचे रिमेक हिंदीत बनले आहे.इतकंच नाही तर दाक्षिणात्य दिग्दर्शकांना आकर्षित करुन हिंदी सिनेमांची निर्मिती करण्याची बॉलिवूडमध्ये जणू काही स्पर्धा सुरु झाली आहे.याचं ताजं उदाहरण म्हणजे 'बाहुबली – द बिगिनिंग' आणि 'बाहुबली – द कनक्लुझन'.करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शन्सने या सिनेमांची निर्मिती केली होती.बाहुबली या सिनेमात सारं काही भव्यदिव्य होतं. त्यातल्या त्यात सिनेमाची कथाही तितकीच खिळवून ठेवणारी आणि रसिकांना थिएटरकडे आकर्षित करणारी होती.त्यामुळे बाहुबली – द बिगिनिंग आणि बाहुबली – द कनक्लुझन या दोन्ही सिनेमांना रसिकांचा भरभरुन प्रतिसाद मिळाला.तिकीट खिडकीवर बाहुबलीच्या दोन्ही सिनेमांनी तिकीट खिडकीवर नवनवे कमाईचे रेकॉर्ड्स रचले.आता मात्र बाहुबली या सिनेमाला टक्कर देण्याची तयारी दक्षिणेच्या एका अभिनेत्यानं सुरु केली आहे.या अभिनेत्याचं नाव आहे विक्रम.दक्षिणेचा सुपरस्टार असलेला विक्रम कायमच काही ना काही हटके करण्याच्या प्रयत्नात असतो.आता बाहुबली सिनेमाला टक्कर देईल आणि त्याच्या तोडीस तोड सिनेमा बनवण्याची तयारी विक्रमने सुरु केली आहे.विक्रमचा हा आगामी सिनेमा सूर्यपुत्र कर्णाच्या आयुष्यावर आधारित असून तो कर्णाची प्रमुख आणि मध्यवर्ती भूमिका साकारणार आहे.'महावीर कर्ण' असं या सिनेमाचं नाव असेल आणि आर. एस. विमन या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहेत.याबाबतची माहिती खुद्द विक्रमने सोशल मीडियावर शेअर केली आहे.‘सूर्यास्तानंतर सूर्योदय होतो,महावीर कर्ण’ अशा शब्दांत त्यांनं एक पोस्ट विक्रमने सोशल मीडियावर केली आहे.या पोस्टमध्ये विक्रमने सिनेमाचे दिग्दर्शक आणि निर्माते यांचीही माहिती दिली आहे.युनायटेड फिल्म किंगडम,न्यूयॉर्क या सिनेमाची निर्मिती करणार आहे.या सिनेमासाठी जगभरातील सर्वोत्तम तंत्रज्ञ काम करणार आहेत.या सिनेमाचं बजेट जवळपास तीनशे कोटीच्या घरात असेल असं बोललं जात आहे.या वर्षी ऑक्टोबर महिन्यात या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे.त्यामुळे विक्रमच्या या बहुचर्चित 'महावीर कर्ण'ची आता सा-यांनाच उत्सुकता लागली आहे.विक्रमच्या प्रत्येक सिनेमाची खास बात असते.विक्रमच्या 'सेतू' या दाक्षिणात्य सिनेमाचा 'तेरे नाम' हा हिंदी रिमेक बॉलिवूडमध्ये बनवण्यात आला होता.'तेरे नाम' या सिनेमामुळेच सलमानच्या करिअरला पुन्हा एकदा नवी उभारी मिळाली होती.Also Read:देवसेना अनुष्का शेट्टीचा 'भागमती' लूक