Join us

दक्षिणेचा सुपरस्टार राम चरण एका सिनेमासाठी घेतो इतके मानधन, कमाई वाचून व्हाल थक्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2019 06:00 IST

दर महिन्याला सेलिब्रिटी गलेलठ्ठ कमाई करतात.करिअरच्या सर्वोच्च शिखरावर असताना होणा-या कमाईचा आकडा पाहून अनेकांना धक्काही बसतो. सध्या दक्षिणेचा राम चरण अशाच एका गोष्टीमुळे चर्चेत आला आहे.

सेलिब्रिटी मंडळींवर रसिक जीव ओवाळून टाकतात. रसिकांचं या सेलिब्रिटींवर मनापासून प्रेम असतं. रसिकांच्या या प्रेमामुळेच सेलिब्रिटी मंडळी त्यांच्या करिअरमध्ये कोट्यवधींची कमाई करतात. दर महिन्याला सेलिब्रिटी गलेलठ्ठ कमाई करतात. करिअरच्या सर्वोच्च शिखरावर असताना होणा-या कमाईचा आकडा पाहून अनेकांना धक्काही बसतो. सध्या दक्षिणेचा राम चरण अशाच एका गोष्टीमुळे चर्चेत आला आहे.

अभिनेता राम चरण हा प्रसिद्ध अभिनेता चिरंजीवी यांचा मुलगा आहे. मात्र तरीही राम चरणने मेहनतीच्या जोरावर स्वतःची वेगळी अशी ओळख निर्माण केली आहे. तुमच्या अंगी कला असेल तर यश, पैसा आणि प्रसिद्धी नक्की मिळते. हेच राम चरणनेही  सिद्ध करून दाखवलंय. आज राम चरण एका सिनेमासाठी जवळपास  12 ते 15 कोटी इतके मानधन घेतो. तसेच राम चरण अभिनयाव्यतिरिक्त बिझनेसही करतो. 

दक्षिणेचा सुपरस्टार बनण्यासाठी राम चरणला प्रचंड मेहनत घ्यावी लागली. सुरुवातीच्या दिवसांत काम करताना त्यालाही ब-याच अडचणींचा सामना करावा लागला. फायटिंग, डान्स आणि आत्मविश्वासाची कमी यामुळे त्याला एखादा सीन शूट करताना बराच त्रास व्हायचा. वडिलांपेक्षा स्वतःची वेगळी ओळख कशी निर्माण करता येईल यासाठी राम चरणनने वेळोवेळी वरिष्ठांकडून मार्गदर्शन घेतले आणि आज  आघाडीचा अभिनेता बनत त्याने सा-यांची मनं जिंकली आहेत.   

स्वःबळावर त्याने  त्याचा आशियाना खरेदी केला आहे. त्याच्या नव्या घराची किंमत जवळपास 38 कोटी इतकी असल्याचे बोलले जात आहे. हे घर हैदराबाद येथे आहे. कोटींच्या संपत्तीचा मालक असला तरी राम चरणला  साधारण आयुष्य जगण्यातच जास्त रस असल्याचे त्याने एका मुलाखतीत म्हटले होते.