Join us  

Vikram! उद्या येतोय साऊथचा आणखी एक धाकड सिनेमा, कमल हासनने इतकं घेतलं मानधन

By ऑनलाइन लोकमत | Published: June 02, 2022 5:13 PM

Vikram South Movie : कमल हासन (Kamal Haasan), विजय सेतुपती (Vijay Sethupathi) आणि मल्याळम सिनेमाचा लोकप्रिय चेहरा फहाद फासिल ( Fahadh Faasil) असे तीन दिग्गज स्टार या चित्रपटात दिसणार आहेत. त्यामुळेच या चित्रपटाची सध्या प्रेक्षकांना जोरदार उत्सुकता लागली आहे.

Vikram South Movie : सध्या साऊथचे सिनेमे बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहेत. पुष्पा, आरआरआर आणि केजीएफ 2 नंतर आणखी एक साऊथचा धाकड सिनेमा उद्या 3 जूनला रिलीज होतोय. या चित्रपटाचं नाव आहे, ‘विक्रम’ (Vikram). या चित्रपटात साऊथ इंडस्ट्रीतील तीन मोठे स्टार्स एकत्र दिसणार आहेत. कमल हासन (Kamal Haasan), विजय सेतुपती (Vijay Sethupathi) आणि मल्याळम सिनेमाचा लोकप्रिय चेहरा फहाद फासिल ( Fahadh Faasil) असे तीन दिग्गज स्टार या चित्रपटात दिसणार आहेत. त्यामुळेच या चित्रपटाची सध्या प्रेक्षकांना जोरदार उत्सुकता लागली आहे. साऊथ सुपरस्टार कमल हासन यांच्या या सिनेमानं रिलीजआधीच 204 कोटींचा बिझनेस केला आहे. चित्रपटाचं बजेट 150 कोटी आहे आणि त्यानुसार, प्रदर्शनापूर्वीच 54 कोटींचं प्रॉफिट पक्क आहे. चार दिवसांआधीपासून या चित्रपटाच्या अ‍ॅडव्हान्स बुकिंगला सुरूवात झाली. सध्या अ‍ॅडव्हान्स बुकिंगसाठी प्रेक्षकांच्या उड्या पडत आहेत.  मोठ्या शहरात पहाटे 4 वाजतापासून लोक अ‍ॅडव्हान्स बुकिंगसाठी रांगा लावत आहेत. चेन्नईत एकाच चाहत्याने चित्रपटाचे 60 तिकिटं खरेदी केली आहेत.

कमल हासन यांनी इतकं घेतलं मानधन‘विक्रम’ या चित्रपटामध्ये कमल हासन मुख्य भूमिकेत आहेत. त्यांनीच हा सिनेमा प्रोड्यूस केला आहे. या चित्रपटासाठी कमल हसन यांनी 50 कोटी मानधन घेतलं आहे. चित्रपटात विजय सेतुपती हा सुद्धा मुख्य भूमिकेत आहे. त्याने या चित्रपटासाठी 10 कोटींचं मानधन घेतल्याचं कळतंय.   ‘विक्रम’ चित्रपटाचं एकूण बजेट हे 150 कोटी आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन लोकेश कनगराज यांनी केलं आहे. 

अक्षयच्या ‘सम्राट पृथ्वीराज’शी टक्करउद्या 4 जूनला अक्षय कुमारचा ‘सम्राट पृथ्वीराज’ रिलीज होतोय. ‘विक्रम’ची अक्षयच्या  या चित्रपटासोबत बॉक्स ऑफिसवर थेट टक्कर होणार आहे. बॉक्सआॅफिसवरच्या या थेट संघर्षात कोण बाजी मारतो ते बघूच. 

टॅग्स :कमल हासनTollywoodबॉलिवूड