Join us
Daily Top 2Weekly Top 5

अक्षय कुमार, हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफला मागे टाकत प्रभासने बनवला नवा रेकॉर्ड   

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2020 13:34 IST

प्रभासचे चाहते फक्त देशातच नाही तर जगभरात आहेत.

दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास एक असा अभिनेता आहे ज्याने आपल्या पॉवरपॅक परफॉर्मेंसने सगळ्यांनाच स्तिमित केले आहे. एक विद्रोही बागी असो किंवा एक रोमँटिक प्रेमी, कोणतीही भूमिका अगदी सक्षमपणे साकारणारा अभिनेता म्हणून प्रभासने स्वत:ला सिद्ध केले आहे.विद्रोही पात्रांविषयी बोलायचे झाल्यास, प्रभासने 2012 मध्ये 'रिबेल' नामक एक चित्रपट केला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार प्रदर्शन केले होते. चित्रपटाचा शेवटचा अॅक्शन सीन या चित्रपटाचा हाय पॉइंट होता, ज्यामुळे प्रभास चाहत्यांच्या गळ्यातला ताईत बनला होता. या अॅक्शन सीक्वेंसला 100 मिलियन हुन अधिक व्ह्युज मिळाले असून संपूर्ण भारतात टीवीवर सर्वाधिक रेटिंग्ज मिळाली होती. 

 आपल्या पिळदार शरीरयष्टी, उंची आणि आकर्षक व्यक्तिमत्वाच्या जोरावर प्रभासने असे काही अद्भुत एक्शन सीक्वेंस दिले आहेत, ज्याविषयी कोणी विचार देखील करू शकत नाही. आपल्या जीवापाड मेहनतीच्या जोरावर आपल्या स्क्रीनवरील सर्वोत्तम प्रदर्शनासाठी तो नेहमीच प्रत्येक दिग्दर्शकाची पहिली पसंती राहिला आहे.

लवकरच प्रभास दिग्दर्शक नाग अश्विन यांच्यासोबत आपल्या आगामी 20 व्या चित्रपटासाठी सज्ज झाला असून या चित्रपटात अधिक एक्शन दृश्य आणि अधिक रोमांस चाहत्यांना पहायला मिळणार आहे.

टॅग्स :प्रभास