Join us
Daily Top 2Weekly Top 5

हृतिक रोशनच्या लग्नातील फोटो पोस्ट करत या अभिनेत्रीने म्हटले, उस दिन मेरा दिल तुट गया

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2020 17:22 IST

या अभिनेत्रीने हृतिकच्या लग्नाच्या रिसेप्शनला हजेरी लावली होती. याच रिसेप्शनचा फोटो पोस्ट करत तिने उस दिन मेरा दिल तुट गया असे लिहिले आहे.

ठळक मुद्देमीना सागरने लिहिले आहे की, मी माझ्या आवडत्या अभिनेत्याला त्याच्या लग्नाच्या रिसेप्शनला भेटले. हे रिसेप्शन बंगलुरू येथे झाले होते. पण त्या दिवशी त्याला भेटून माझे हृदय तुटले....

कोरोनामुळे अख्खा देश लॉकडाऊन आहे आणि लॉकडाऊनच्या काळात सगळेजण आपआपल्या घरात कैद आहे. सामान्य लोकच नव्हे तर सेलिब्रेटीदेखील आपल्याच घरात असून घरातल्यांसोबत जास्तीत जास्त वेळ घालवत आहेत. तसेच सेलिब्रेटी सोशल मीडियावर देखील चांगलेच सक्रिय आहेत. एका दाक्षिणात्य अभिनेत्रीने हृतिक रोशनच्या लग्नातील एक फोटो नुकताच सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. पण या फोटोपेक्षा तिने या फोटोसोबत दिलेल्या कॅप्शनची सोशल मीडियावर अधिक चर्चा रंगली आहे.

दाक्षिणात्य अभिनेत्री मीना सागरने हृतिक रोशनच्या लग्नाच्या रिसेप्शनमधील एक फोटो पोस्ट केला असून त्यासोबत लिहिले आहे की, मी माझ्या आवडत्या अभिनेत्याला त्याच्या लग्नाच्या रिसेप्शनला भेटले. हे रिसेप्शन बंगलुरू येथे झाले होते. पण त्या दिवशी त्याला भेटून माझे हृदय तुटले.... या फोटोत एक व्यक्ती हृतिकला मीनाची ओळख करून देत असून हृतिक तिला हँड शेक करत असताना आपल्याला दिसत आहे.

हृतिक रोशनची गणना आज बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्यांमध्ये होते. त्याचे लग्न काही वर्षांपूर्वी सुजैन खानसोबत झाले होते. सुजैन ही प्रसिद्ध अभिनेता संजय खान यांची मुलगी आहे. सुजैन आणि हृतिक लहानपणापासून एकमेकांना ओळखत होते. अनेक वर्षांच्या नात्यानंतर त्यांनी लग्न केले. पण हे लग्न काहीच वर्षांत मोडले आणि त्यांनी घटस्फोट घेतला. त्यांना दोन मुलं असून ते दोघेही हृतिकसोबत राहातात. हृतिक आणि सुजैन यांनी धुमधडाक्यात लग्न केले होते आणि लग्नाचे रिसेप्शन मुंबईप्रमाणेच बंगलुरू येथे दिले होते. या रिसेप्शनला दाक्षिणात्य इंडस्ट्रीतील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती. याच रिसेप्शनला मीना सागरला देखील निमंत्रित करण्यात आले होते. तिने हीच जुनी आठवण सोशल मीडियावर शेअर केली आहे.

कोरोना व्हायरसने घातलेल्या थैमानामुळे सध्या भारतात लॉकडाऊन असून दोन्ही मुलांची काळजी घेण्यासाठी सुजैन हृतिकच्या घरी परतली आहे. हृतिक आणि सुजैन आपल्या मुलांसोबत हृतिकच्या घरी वेळ घालवत आहेत.

टॅग्स :हृतिक रोशन