तामिळ सुपरस्टार आणि राजकीय नेते रजनीकांत यांची मुलगी सौंदर्या हिने गतवर्षी पतीपासून घटस्फोट घेतला. पण आता सौंदर्या दुसरे लग्न करणार असल्याची बातमी आहे. होय, ताजी बातमी खरी मानाल तर येत्या जानेवारीत सौंदर्या पुन्हा लग्नगाठ बांधणार आहे. सौंदर्याने अलीकडे अभिनेता व उद्योगपती विशगन वनन्गमुंदी (Vishagan Vanangamudi) याच्यासोबत साखरपुडा केल्याचे कळतेय. या अतिशय खासगी सोहळ्यात केवळ दोघांचे कुटुंबीयचं तेवढे हजर होते.
२०१० मध्ये सौंदयाने उद्योगपती अश्विनसोबत लग्न केले होते. ३ सप्टेंबर २०१० रोजी सौंदर्या व अश्विन दोघेंही लग्नबंधनात अडकले होते. लग्नापूर्वी चार वर्षे ते एकमेकांना डेट करत होते. गतवर्षी सौंदर्या व अश्विन त्यांच्यातील वाद विकोपाला पोहोचले होते. रजनीकांत यांनी सौंदर्या व अश्विन यांच्यात मध्यस्थी करण्याचे बरेच प्रयत्न केले होते. मात्र दोघेही घटस्फोटाच्या निर्णयावर ठाम होते. अखेर गत वर्षी दोघांनीही कायदेशीर घटस्फोट घेतला. मी माझ्या पतीपासून विभक्त झालेय, असे यानंतर सौंदयार्ने टिष्ट्वटरवरून जाहिर केले होते.