Join us

मन जिंकलंस रे भावा! सोनू सूद पुन्हा बनला देवदूत, केली ऑक्सिजन सिलेंडरची व्यवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 15:04 IST

आता सोनूने काहींना ऑक्सिजन सिलेंडर पाठवले आहेत.

ठळक मुद्देइंदौरमधील काही रुग्णांना ऑक्सिजन सिलेंडरची नितांत गरज होती.

कोरोना काळात सोनू सूदने देवदूत बनून लोकांना प्रचंड मदत केली आहे. अनेकांना त्याने त्यांच्या घरी परतण्यासाठी मदत केली होती आणि आता त्याने काहींना ऑक्सिजन सिलेंडर पाठवले आहेत.

झी न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, इंदौरमधील काही रुग्णांना ऑक्सिजन सिलेंडरची नितांत गरज होती. त्याने 10 ऑक्सिजन सिलेंडर पुरवले असून काहींंना इंजेक्शन देखील पुरवले आहेत.

कोरोना काळात मास्क घाला, सुरक्षित अंतर ठेवा असे देखील तो त्याच्या चाहत्यांना सांगत आहे.

इंदौरमधील मंडळीनी सोशल मीडियाद्वारे त्याचे आभार मानले आहेत. एकाने ट्वीट केले आहे की, तुम्ही देवापेक्षा कमी नाही आहात... तुम्ही कोरोना काळात लोकांना जी मदत केली त्यासाठी तुमचे जितके आभार मानाल, तितके कमी आहेत.

तर एकाने ट्वीट करून म्हटले आहे की, माझ्या आईसाठी चार रेमडेसीविर इंजेक्शन सोनू सूदने पाठवली. तिला मलेरिया, न्यूमोनिया आणि कोरोना सगळे काही एकत्र झाले आहे. या इंजेक्शमुळे माझ्या आईचे प्राण वाचले. 

टॅग्स :सोनू सूद