Join us
Daily Top 2Weekly Top 5

शांतीच्या शोधासाठी परिवारासह बुद्धगया येथे पोहोचला सोनू निगम, पहा फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2017 21:17 IST

प्रसिद्ध गायक सोनू निगमने गेल्या शनिवारी बिहारमधील प्रसिद्ध धार्मिक स्थळ बुद्धगया आणि विष्णुपद मंदिरात पूजाअर्चना केली. यावेळी त्याने पवित्र ...

प्रसिद्ध गायक सोनू निगमने गेल्या शनिवारी बिहारमधील प्रसिद्ध धार्मिक स्थळ बुद्धगया आणि विष्णुपद मंदिरात पूजाअर्चना केली. यावेळी त्याने पवित्र महाबोधी वृक्षाचे दर्शनही घेतले. सोनू निगम सकाळीच परिवारातील काही सदस्यांसह बुद्धगया येथे पोहोचला होता. त्यानंतर तो सर्वात अगोदर महाबोधी मंदिरात गेला. याठिकाणी पूजाअर्चना केल्यानंतर त्याने पवित्र महाबोधी वृक्षाचे दर्शन घेतले. असे म्हटले जाते की, याच महाबोधी वृक्षाखाली महात्मा गौतम बुद्ध यांना ज्ञान प्राप्त झाले होते. सोनू निगम पुढे विष्णुपद मंदिरात गेला. त्याठिकाणी त्याने भगवान विष्णुंचे दर्शन घेतले. याठिकाणी जवळपास पंधरा मिनिटे त्याने पूजाअर्चना केली. यावेळी सोनू निगमने येथील लोक खूपच भाग्यशाली असल्याचे म्हटले. याठिकाणी खूप शांती मिळते. त्यामुळे येथील लोक खरोखरच खूप भाग्यशाली आहेत. मला याठिकाणी आल्यानंतर खूप आनंद होत आहे. यावेळी सोनू निगमने पुन्हा एकदा संपूर्ण परिवारानिशी याठिकाणी येणार असल्याचे सांगितले. दरम्यान, जेव्हा सोनू या दोन्ही धार्मिकस्थळी पोहोचला तेव्हा त्याला बघण्यासाठी त्याच्या चाहत्यांनी एकच गर्दी केली होती. काही चाहत्यांनी त्याच्यासोबत सेल्फी काढण्याचाही आनंद घेतला. यावेळी सोनूनेदेखील त्याच्या चाहत्यांना निराश केले नाही. येत्या शुक्रवारी सोनू पटना येथील एका कार्यक्रमात सहभागी होणार आहे.