Join us

सोनमनंतर कपूर परिवारातील ‘या’ मुलीचा होणार विवाह!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2018 21:12 IST

अभिनेत्री सोनम कपूर बॉयफ्रेंड आनंद आहुजा याच्याशी विवाहाच्या बंधनात अडकली. आता सोनमनंतर कपूर परिवारातील या मुलीचा विवाह होणार आहे.

बºयाचशा अफवा आणि अंदाज लावल्यानंतर अखेर सोनम कपूर बॉयफ्रेंड आनंद आहुजा याच्यासोबत लग्नाच्या बंधनात अडकली. अतिशय थाटामाटात या दोघांचा विवाहसोहळा पार पडला. जेव्हा सोनम आणि आनंद एकमेकांसोबत जन्मोजन्मीच्या गाठी बांधत होते, तेव्हा त्याठिकाणी कपूर परिवारासह बॉलिवूडमधील अनेक दिग्गज मंडळी उपस्थित होती. दरम्यान, सोनमचे लग्न पार पडल्यानंतर प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न असेल तो म्हणजे सोनमनंतर आता कोण नवरी होणार? तर अंदाजाच्या पलीकडे जाऊन भारतीय रीतिरिवाजाप्रमाणे विचार केल्यास सोनमनंतर कपूर खानदानातील अर्जुन कपूरची बहीण अंशुला कपूर हिचा विवाह होण्याची शक्यता आहे.  आता तुम्ही विचार करीत असाल की, आम्ही एवढे ठामपणे का सांगत आहोत. तर याबाबतचे संकेत सोनमच्या लग्नातच मिळाले आहेत. एका विधीप्रसंगी ज्या पद्धतीने अंशुला हिला पुढे करण्यात आले त्यावरून सोनमनंतर अंशुलाचे लग्न केले जाईल हे स्पष्ट होते. त्याचबरोबर अंशुलाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक फोटो शेअर करून त्याबाबतचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे कपूर परिवारात पुढचा विवाह अंशुलाचा असेल हे जवळपास स्पष्ट आहे. कारण अंशुलाने या विधीप्रसंगाचा एक फोटो शेअर करताना त्याच्या आजूबाजूला काही स्टार्सही पोस्ट केले. ज्यावरून हेदेखील स्पष्ट होते की, अंशुलालादेखील याबाबतची भनक लागली असावी की, सोनमनंतर आता तिचाच क्रमांक आहे. दरम्यान, सोनमच्या लग्नात इंडस्ट्रीतील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती. महानायक अमिताभ बच्चन यांच्यासह अनेक सेलिब्रिटी या लग्नात पोहोचले होत. सध्या सोनम आणि आनंदच्या लग्नाचे रिसेप्शन सुरू आहे.