Join us

सोनमने घेतली ऐशची जागा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2016 01:08 IST

ऐश्वर्या रॉय बच्चन ही कित्येक वर्षांपासून प्रसिद्ध ब्रँड ‘कल्याण ज्वेलर्स’ ची जाहीरात करते. पण आता ही जाहीरात ऐश्वर्या करू ...

ऐश्वर्या रॉय बच्चन ही कित्येक वर्षांपासून प्रसिद्ध ब्रँड ‘कल्याण ज्वेलर्स’ ची जाहीरात करते. पण आता ही जाहीरात ऐश्वर्या करू शकणार नाही. कारण फॅशनिस्टा सोनम कपूरने तिची जागा घेतली आहे.रमेश कल्याणरमण म्हणाले,‘ आम्ही ऐश्वर्या रॉयचे आभारी आहोत कारण त्यांनी आमच्या वस्तूला एक ब्रँड म्हणून ओळख निर्माण करून दिली. गेल्या तीन वर्षांपासून कल्याण हा एक प्रसिद्ध ब्रँड त्यामुळेच बनू शकला. पण आम्हाला सोनम कपूरवर देखील तितकाच विश्वास आहे.स्टाईल आयकॉन सोनमही आता हे नाव अजून वर घेऊन जाईल यात काही शंकाच नाही.’ ‘नीरजा’ मधील सोनमच्या अभिनयामुळे ती ही जाहीरात नक्कीच हिट करेल, असे वाटते. तिच्यावर एवढा विश्वास जाहीरातीच्या टीमने दाखवल्याने ती देखील उत्सुक आहे.