सोनम म्हणते, वय सांगण्यात शरम कसली
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2016 17:33 IST
गुरुवारी ३१ वा वाढदिवस साजरा करणारी सोनम कपूर म्हणते, तिला आपले वय सांगण्यात कोणतीही लाज वाटत नाही.मी ३१ ...
सोनम म्हणते, वय सांगण्यात शरम कसली
गुरुवारी ३१ वा वाढदिवस साजरा करणारी सोनम कपूर म्हणते, तिला आपले वय सांगण्यात कोणतीही लाज वाटत नाही.मी ३१ वर्षांची आहे, मी सांगते आहे. माझे वय सांगण्यात मला कसलीही शरम वाटत नाही, असे सोनमने सांगितले.हे वर्ष सोनमसाठी महत्वाचे ठरले. नीरजा मधील तिच्या कामाचे कौतुक झाले. माझ्या कामाचे जे कौतुक केले, त्याबद्दल आभार. माझे काम लोकांना आवडते आहे अशी आशा आहे. लोकांना चांगले द्या, जगासाठी चांगले करा, असेही ती म्हणाली.वाढदिवसादिवशीही काम करताना हे वर्ष समाधानाचे जाईल असे सोनमला वाटते. नीरजानंतर तिने नवीन प्रोजेक्टबाबत काहीही सांगितले नाही. दोन दिवसात याविषयी घोषणा होईल. तो माझा नवीन चित्रपट असेल. डॅड अनिल कपूर यांचा ‘२४’ आणि हर्षच्या (हर्षवर्धन कपूर) चित्रपटाचा टीजर पहिल्यांदा येऊ दे. त्यानंतर मी माझ्या चित्रपटाविषयी बोलेन. ११ जून रोजी अधिकृत घोषणा होईल, असे सोनम म्हणाली.