Join us
Daily Top 2Weekly Top 5

​सोनम, आपल्या बापाकडून काही तरी शिक!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2017 12:50 IST

सोनम कपूर सध्या चर्चेत आहे, ती बॉयफ्रेन्ड आनंद अहुजा याच्यासोबतच्या डेटिंग न्यूजमुळे. पण काल-परवा एका अवार्ड फंक्शनमध्ये जे झाले, ...

सोनम कपूर सध्या चर्चेत आहे, ती बॉयफ्रेन्ड आनंद अहुजा याच्यासोबतच्या डेटिंग न्यूजमुळे. पण काल-परवा एका अवार्ड फंक्शनमध्ये जे झाले, त्याने सोनम चांगलीच चर्चेत आली. आता या अवार्ड फंक्शनमध्ये असे काय विशेष झाले, हे जाणून घेण्यास तुम्ही  उत्सूक असाल. तर पुढचे वाक्य वाचा. या अवार्ड शोमध्ये वडिल अनिल कपूरने सोनमला सर्वांदेखत चांगलेच फटकारले. होय, तुम्ही वाचतायं, ते अगदी खरे आहे. या अवार्ड सोहळ्यात सोनम आणि तिचे वडिल अनिल कपूर दोघेही सहभागी झाले होते. या इव्हेंटमध्ये ‘नीरजा’चे दिग्दर्शक राम माधवानी आणि ‘पिंक’चे दिग्दर्शक अनिरूद्ध राय चौधरी यांना २०१६चे सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून गौरविण्यात आले. अनिल कपूर आणि त्याचा बंधू बोनी कपूर यांच्या हस्ते हा पुरस्कार दिला जाणार होता. यावेळी अनिल कपूरने नीरजा’च्या संपूर्ण टीमला मंचावर बोलवले. संपूर्ण टीम मंचावर आली. पण ‘नीरजा’ अर्थात सोनम कपूर मंचावरून गायब होती. ती स्टेजमागे आपल्या मित्रांसोबत गप्पा करण्यात बिझी होती. अनिलने अनेकदा तिचे नाव पुकारले. पण सोनमने ऐकल्या न ऐकल्यासारखे केले. आता आपल्या मुलीचे असे जाहिर वागणे कुण्याही बापाला खटकेलच. अनिलाही खटकले. अखेर त्याला सर्वांसमोर माईकवर सोनमला सुनावावे लागले. सोनम, आपल्या बापाकडून काहीतरी शिक, असे अनिल म्हणाला. आता बापाकडून काहीतरी शिक म्हटल्यावर सोनम काहिशा नाखुशीनेच मंचावर आली. दिग्दर्शर्काला अवार्ड देईपर्यंत कशीबशी थांबली आणि लगेच मंचावरून निघाली सुद्धा. राम माधवानीचे मंचावर दोन शब्द बोलत होते, पण ते पूर्ण होण्याची प्रतीक्षाही न करता सोनम मंचावर निघून गेली. वडिलांनी सर्वांदेखत असे फटकारलेले कदाचित तिला आवडलेले नसावे.