Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘कोल्डप्ले कॉन्सर्ट’ मध्ये सोनमची धम्माल !

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2016 10:09 IST

 कोल्डप्ले म्युझिक व्हिडिओ ‘हायमन फॉर द विकेंड शॉट इन इंडिया’ याचा सोनम कपूर देखील हिस्सा होती. तिचा या व्हिडीओत ...

 कोल्डप्ले म्युझिक व्हिडिओ ‘हायमन फॉर द विकेंड शॉट इन इंडिया’ याचा सोनम कपूर देखील हिस्सा होती. तिचा या व्हिडीओत केवळ तीनच सेकंदांचा परफार्मन्स होता तरीही तिला विविध प्रतिक्रिया प्रेक्षकांमधून मिळाल्या.लंडन येथे नुकतेच कोल्डप्ले कॉन्सर्ट पार पडले. तिने या कॉन्सर्टमध्ये खुप धम्माल केली. फॅशनिस्टा सोनम कपूर तशीही धम्माल करण्यासाठी खुप उत्सुकच असते. या कॉन्सर्टवेळी तिच्या आवडीचेच सर्व गाणी तिथे सादर करण्यात आली.ती तिच्या लंडन येथील गर्ल गँग सोबत तिथे गेली होती. ती तिथे गात होती, डान्स करत होती. तिच्यासोबत क्रिस मार्टिन, जॉनी बकलँड, गे बेरीमॅन, विल चॅम्पियन, फिल हार्वे हे होते. या कॉन्सर्टनंतर ती पॅरिसला रवाना झाली.तिथे तिचे जवळचे मित्र राल्फ आणि रूसो फॅशन वीक साठी चिफ गेस्ट म्हणून आमंत्रित होती. ती त्यांचे ड्रेसेस यंदाच्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये घालणार आहे.