Join us
Daily Top 2Weekly Top 5

७० कोटींच्या ‘या’ बंगल्यात होणार सोनम कपूरचा विवाह!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2018 14:38 IST

सध्या अभिनेत्री सोनम कपूर हिच्या लग्नाची सर्वत्र चर्चा रंगत आहे. बºयाच काळापासून ती बॉयफ्रेंड आनंद आहुजाला डेट करीत असून, ...

सध्या अभिनेत्री सोनम कपूर हिच्या लग्नाची सर्वत्र चर्चा रंगत आहे. बºयाच काळापासून ती बॉयफ्रेंड आनंद आहुजाला डेट करीत असून, लवकरच त्याच्यासोबत लग्नाच्या बंधनात अडकणार आहे. या पंजाबी रॉयल वेडिंगची तयारी सुरू झाली असून, हळद, संगीत आणि मेहंदीचा कार्यक्रम ७ मे रोजी मुंबईतील एका फाईव्ह स्टाइल हॉटेलमध्ये पार पडणार आहे. तर वेडिंग सेरेमनी सोनमची आण्टी आणि इंटीरियर डिझायनर कविता सिंग यांच्या बॅण्डस्टॅण्डस्थित आलिशान बंगल्यात पार पडणार आहे. लग्नाचे सर्व विधी घरातच असलेल्या मंदिरात केले जाणार आहेत. पिंकविला रिपोर्टनुसार, कविता सिंगचा हा बंगला ५५ हजार स्केअर फूट परिसरात बांधण्यात आला आहे. या बंगल्याचे नाव रॉकडेल असून, तो खूपच आलिशान आहे. मुंबईतील सर्वात महागड्या परिसरात असलेल्या या बंगल्याची किंमत सुमारे ७० कोटी रुपये इतकी आहे. या परिसरात सध्या प्रॉपर्टीच्या किमती एक लाख रुपये प्रती फूट इतकी आहे. या सी फेसिंग बंगल्यात एक मोठे पूजाघर (मंदिर) आहे. ज्याठिकाणी श्री गणेशाची मूर्ती आहे. त्याचबरोबर या घराच्या दक्षिण बाजूला एक झरोखा (खिडकी) आहे. दरम्यान, कपूर परिवारातील सोनमचा विवाह सर्वात महागडा विवाह ठरणार आहे. सध्या संगीताची रिहर्सल अनिल कपूरच्या जुहू बंगल्यात सुरू आहे. नुकतेच संदीप खोसलाच्या पुतणीच्या लग्नात सोनमने ‘प्रेम रतन धन पायो’ या गाण्यावर डान्स केला होता. सोनम होणार पती आनंद आहुजा एक बिझनेसमॅन आहे. आनंद अपॅरल Bhane ब्रॅण्डचा मालक आहे. देशातील सर्वात मोठी एक्सपोर्ट कंपनी म्हणून या ब्रॅण्डकडे बघितले जाते. या कंपनीचे वार्षिक टर्नओव्हर ४५० मिलियन डॉलर आहे. त्याचबरोबर आनंद आपल्या फॅमिली बिझनेसचेही काम बघतो. तसेच शाही एक्सपोर्ट्स तो एमडी आहे. आनंदला कपडे आणि शूजमध्ये खूप रूची आहे. तो VegNonVeg स्टोरीचा को-फाउंडर आहे. यामध्ये वेगवेगळ्या ब्रॅण्डचे शूज मिळतात. वृत्तानुसार सोनम आणि आनंदने लंडन येथे एक घरही खरेदी केले आहे.