Join us

सोनम कपूरच्या लग्नाच्या रिसेप्शनमध्ये ऋषी कपूर अन् सोहेल खानच्या पत्नीचे झाले भांडण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2018 18:30 IST

अभिनेत्री सोनम कपूरच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ अजूनही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. लग्नात आलेला प्रत्येक पाहुणा आनंदाच्या भरात ...

अभिनेत्री सोनम कपूरच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ अजूनही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. लग्नात आलेला प्रत्येक पाहुणा आनंदाच्या भरात डान्स आणि मस्ती करताना व्हिडीओमध्ये दिसत आहे. अतिशय थाटामाटात पार पडलेल्या लग्नानंतर रिसेप्शन सोहळ्यातील ही रंगत बघण्यासारखी होती. रिसेप्शनमध्ये आलेल्या स्टार्सनी तर अशी काही धमाल केली की, त्यांचे सोशल मीडियावरील व्हिडीओ चाहते वारंवार बघत आहेत. विशेषत: सलमान-शाहरूखचा मूड बघण्यासारखा होता. मात्र आता याच रिसेप्शनमधील एक बातमी समोर येत आहे. होय, असे म्हटले जात आहे की, रिसेप्शन पार्टीत पोहोचलेले अभिनेता ऋषी कपूर आणि सीमा खान यांच्यात भांडण झाले आहे. हे भांडण सलमानच्या पाठीमागेच झाल्याचेही बोलले जात आहे. सूत्रानुसार, ऋषी कपूर यामुळे संतापले की, पार्टीत सलमान त्यांच्याशी व्यवस्थित तर बोलला नाहीच, शिवाय त्याचे वर्तन ठीक नव्हते. वास्तविक तो पार्टी एन्जॉय करण्यात व्यस्त होता. तो सिंगिंग आणि डान्सिंगमध्ये असा काही मग्न झाला होता की, त्याला कंट्रोल करणे अवघड झाले होते. जेव्हा ऋषीने सलमानची वहिनी सीमा खान (सोहेल खानची पत्नी) हिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला तेव्हा ती संतापली. तसेच सलमानकडे तक्रारही केली. याच कारणामुळे ऋषी आणि सीमामध्ये बाचाबाची झाली. हे प्रकरण एवढे वाढले की, ऋषीने पार्टीतून काढता पाय घेणे योग्य समजले. त्यानंतर सीमाने ऋषी कपूर आणि तिच्यात झालेल्या वादाबद्दल सलमानला सांगितले. ते ऐकून सलमान चांगलाच अपसेट झाल्याचे दिसून आले. ऋषी पार्टीत पत्नी नीतू कपूरसोबत पोहोचले होते. तर त्यांचा मुलगा रणबीर कपूर आलिया भट्टसोबत बघावयास मिळाला. दरम्यान, सोनम कपूरने गेल्या ८ मे रोजी लॉन्गटाइम बॉयफ्रेंड आनंद आहुजा याच्याशी लग्न केले. दिवसा लग्न समारंभ पार पडल्यानंतर रात्री मुंबईतील हॉटेल लीलामध्ये ग्रॅण्ड रिसेप्शनचे आयोजन केले होते. रिसेप्शन पार्टीत सलमान-जॅकलिनसह अनेक कलाकारांनी जबरदस्त जल्लोष केला. शाहरूखचाही अंदाज यावेळी बघण्यासारखा होता.