Join us

सोनम कपूरचा बॉयफ्रेंडसोबतचा पर्सनल व्हिडीओ झाला लीक, पाहा व्हिडीओ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2018 18:36 IST

अभिनेत्री सोनम कपूर सध्या तिच्या लग्नावरून चर्चेत आहे. लवकरच ती बॉयफ्रेंडसोबत लग्नाच्या बंधनात अडकणार असल्याचे बोलले जाते. परंतु अशातच तिचा एक पर्सनल व्हिडीओ समोर आला आहे.

अभिनेत्री सोनम कपूर सध्या चांगलीच चर्चेत आहे. एकीकडे तिचा ‘पॅडमॅन’ हा बहुचर्चित चित्रपट प्रदर्शनाच्या उंबरठ्यावर आहे, तर दुसरीकडे ‘वीरे दी वेडिंग’ या चित्रपटामुळेही ती लाइमलाइटमध्ये आहे. त्याचबरोबर सोनम वर्कफ्रंटव्यतिरिक्त तिच्या पर्सनल लाइफमुळे चांगलीच प्रकाशझोतात आली आहे. होय, सोनम लवकरच लग्नाच्या बंधनात अडकणार असून, बॉयफ्रेंडसोबत ती याचवर्षी लगीनगाठ बांधण्याची शक्यता आहे. असो, सोनमबद्दल आता सांगायचे कारण असे की, तिचा एक पर्सनल व्हिडीओ लीक झाला असून, सोशल मीडियावर तो वाºयासारखा व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये सोनम तिचा बॉयफ्रेंड आनंद आहुजा याला व्हिडीओ कॉल करताना दिसत आहे. वास्तविक व्हिडीओमध्ये सोनम दिसत नसली तरी तिचा आवाज ऐकावयास मिळत आहे. सध्या तिचा हा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होत असून, दोघांचे खासगी संभाषण ऐकावयास मिळत आहे. पिंकविलाच्या इन्स्टाग्राम पेजवर असलेल्या या व्हिडीओमध्ये सोनम तिच्या बॉयफ्रेंडला फनी फेस बनविण्यास सांगत आहे. सोनमची ही फर्माइश ऐकून आनंद हसायला लागतो.  आनंद आणि सोनम लवकरच लग्नाच्या बंधनात अडकणार आहेत. सध्या त्यांच्या लग्नावरून चांगलीच चर्चा रंगली असून, याच वर्षाच्या जून महिन्यात ते लग्न करणार असल्याचे बोलले जाते. सुरुवातीला एप्रिल महिन्यात लग्न करणार असल्याची माहिती समोर आली होती. असो, सध्या सोनम तिच्या ‘पॅडमॅन’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. हा चित्रपट येत्या ९ फेब्रुवारीला रिलीज होणार आहे. चित्रपटात तिच्यासोबत अक्षयकुमार आणि राधिका आपटे प्रमुख भूमिकेत बघावयास मिळतील.