Join us
Daily Top 2Weekly Top 5

सोनम कपूरचा होणारा पती आनंद आहुजा इतक्या कोटींच्या संपत्तीचा आहे मालक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2018 16:19 IST

बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर येत्या ८ मे रोजी बॉयफ्रेंड आनंद आहुजासोबत विवाहाच्या बंधनात अडकणार आहे, तो कोट्यवधींच्या संपत्तीचा मालक आहे.

बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर आणि आनंद आहुजा येत्या ८ मे रोजी विवाहाच्या बंधनात अडकणार आहेत. गेल्या बºयाच काळापासून सुरू असलेल्या अफवा आणि गॉसिप्सवर कपूर आणि आहुजा परिवाराने पूर्णविराम देत संयुक्तरीत्या त्यांच्या लग्नाच्या तारखेची घोषणा केली आहे. खरं तर सोनम आणि आनंद गेल्या बºयाच काळापासून एकमेकांना डेट करीत आहेत. बºयाचदा त्यांना एकत्र बघण्यात आले आहे. असो, सोनमच्या होणारा पती म्हणजेच आनंद आहुजाविषयी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. तत्पूर्वी सोनमच्या स्टाइलविषयी तुम्ही जाणून आहात. याच्याशी संबंधित तिच्या होणाºया पतीचा व्यवसाय  आहे. होय, आनंद आहुजा भारतातील टॉप बिझनेसमॅनपैकी एक आहे. कथितरीत्या तो तीन हजार कोटी रुपयांच्या संपत्तीचा मालक आहे.   आनंद देशातील सर्वात मोठ्या एक्सपोर्ट हाउस म्हणजे शाही एक्सपोर्टचे मालक हरिष आहुजाचा यांचा मुलगा आहे. आनंद या कंपनीचा व्यवस्थापकीय संचालक आहे. हा त्याचा फॅमिली बिझनेस आहे. दिल्ली येथून सुरुवातीचे शिक्षण घेतल्यानंतर आनंदने अमेरिकेत त्याचे ग्रॅज्युएशन पूर्ण केले. तसेच प्रतिष्ठित बिझनेस स्कूल व्हार्टन येथून त्याने एमबीएचे शिक्षण घेतले. त्याचबरोबर त्याने अमॅजॉन.कॉममध्ये प्रॉडक्ट मॅनेजर म्हणूनही काम केले.  आनंदला फिरण्याबरोबरच शूज आणि फुटबॉलचा छंद आहे. त्याच्या शू रॅँकमध्ये विविध ब्रॅण्डचे आणि वेगवेगळ्या डिझाइनचे मोठे कलेक्शन आहे. त्याने त्याच्या याच छंदाला बिझनेसमध्ये रूपांतरित केले. तसेच व्हेज-नॉनव्हेज नावाची मल्टी ब्रॅण्ड स्नीकर कंपनी स्थापित केली. त्याचबरोबर Bhane नावाच्या कंपनीचाही तो मालक आहे.  दरम्यान, सोनम आणि आनंद गेल्या २०१४ पासून एकमेकांना डेट करीत आहेत. मात्र अशातही या दोघांनी नेहमीच एकमेकांचे नाते माध्यमांपासून दूर ठेवले. मात्र सोशल मीडियावर या दोघांनी खुल्लमखुल्ला प्रेमाची कबुली दिली. कारण जगातील विविध देशांमध्ये भटकंती करतानाचे फोटोज् त्यांनी नेहमीच सोशल मीडियावर अपलोड केले. असे म्हटले जाते की, कॉमन फ्रेंड प्रेरणाने सोनम आणि आनंदची पहिली भेट घालून दिली. २०१४ मध्ये आनंदने सोनमला प्रपोज केले. काही महिन्यांचा कालावधी घेतल्यानंतर सोनमने आनंदला होकार दिला.