सोनम कपूर सलमान खाननंतर या ‘खान’बरोबर झळकणार!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2017 15:44 IST
‘प्रेम रतन धन पायो’ या सिनेमात सलमान खानबरोबर झळकलेली अभिनेत्री सोनम कपूर लवकरच शाहरूख खानबरोबर पडद्यावर स्क्रीन शेअर करताना ...
सोनम कपूर सलमान खाननंतर या ‘खान’बरोबर झळकणार!
‘प्रेम रतन धन पायो’ या सिनेमात सलमान खानबरोबर झळकलेली अभिनेत्री सोनम कपूर लवकरच शाहरूख खानबरोबर पडद्यावर स्क्रीन शेअर करताना बघावयास मिळणार आहे. आनंद एल. राय यांच्या आगामी सिनेमात या दोघांना कास्ट केल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. शाहरूखचा नुकताच रिलिज झालेल्या ‘रईस’ या सिनेमाने बॉक्स आॅफिसवर बºयापैकी कमाई केली आहे. रईसची सक्सेस पार्टी सेलिब्रेट केल्यानंतर आता तो पुढच्या प्रोजेक्टच्या तयारीला लागला आहे. आनंद एल. राय यांच्या दिग्दर्शनाखाली तयार होत असलेल्या सिनेमामध्ये तो झळकणार असल्याचे निश्चित समजले जात आहे. वास्तविक हा सिनेमा गेल्या वर्षभरापासून चर्चेत होता. सुरुवातीला या सिनेमात सलमान खान झळकणार असल्याचे बोलले जात होते. कारण सलमानला या सिनेमाची पटकथा आवडली होती. तो सिनेमासाठी होकारही देणार होता. परंतु आनंद एल. राय यांनी त्याचा होकार न ऐकताच माध्यमांमध्ये त्याच्या नावाची घोषणा केली होती. मात्र भाईजानला हीच बाब खटकली. त्याने आनंद एल. राय यांना खडेबोल सुनावत सिनेमा करणार नसल्याचे स्पष्ट केले. तसेच कबीर खान दिग्दर्शित ‘ट्यूबलाइट’ हा सिनेमा साईन केला. सलमानच्या या नकारामुळे आता आनंद एल. रायचा हा सिनेमा शाहरूखच्या पारड्यात पडला आहे. सिनेमात शाहरूख सोनम कपूरबरोबर झळकणार असून, पहिल्यांदाच हे दोघे स्क्रिन शेअर करताना बघावयास मिळणार आहेत. तर सोनम कपूर हिने यापूर्वीच ‘रांझणा’मध्ये आनंद एल. राय यांच्याबरोबर काम केले आहे.याविषयी काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत सोनमने सांगितले होते की, मला नाही वाटत की शाहरूख माझ्याबरोबर काम करण्यास फारसा उत्सुक आहे. मला त्याच्यासोबत काम करायचे आहे, परंतु माझ्या मते त्याच्यासोबत काम करण्याची वेळ निघून गेली आहे. सोनमच्या या मुलाखतीवरून पुढे चांगलेच वादंग निर्माण झाले होते. मात्र तिने सारवासारव करताना माझ्या मुलाखतीचा चुकीचा अर्थ काढला गेल्याचे स्पष्ट केले होते. दरम्यान, हाती आलेल्या वृत्तानुसार आनंद एल. राय यांनी त्यांच्या आगामी सिनेमासाठी या दोघांना कास्ट केले आहे. सोनमऐवजी कॅटरीना कैफ आणि दीपिका पादुकोण यांच्या नावाचीही चर्चा होती. परंतु आता सोनमचे नाव निश्चित झाले आहे. मात्र सिनेमाचे नाव अद्यापपर्यंत स्पष्ट केले नाही.