ट्रोल होणे नवे नाही. सेलिब्रिटी पोस्ट करतात आणि ट्रोलर्स त्यांना ट्रोल करतात. सोनम कपूर तर अनेकदा ट्रोल झालीय. एका ताज्या पोस्टवरून ट्रोलर्सने पुन्हा एकदा सोनमला लक्ष्य केले आहे. होय, कालच सोनमने ही पोस्ट केली आणि लोकांनी तिला नाही नाही ते सुनावले. काल सोनमने एक फोटो पोस्ट केला. या फोटोवर लोकांचा आक्षेप नव्हता. पण या फोटोसोबतचे कॅप्शन वाचून मात्र काहींची सटकली.
‘ अॅक्टर्स आपल्या नव्या आऊटफिटचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करू लागले आहेत, हे पाहून मी खुश आहे. यामुळे नव्या डिझाईनर्सला प्रेरणा मिळले,’ असे सोनमने लिहिले. इतकेच नाही तर बहीण रिया कपूरला हिला टॅग करत, ‘हा ट्रेंड आपण सुरु केला, याचा मला आनंद आहे,’ असे सोनमने लिहिले. सोनमने हे पोस्ट शेअर केली आणि लोकांनी तिला ट्रोल करणे सुरु केले.
एकाने तर, तू अशी बोलतेयेस जणू तू युएसची प्रेसिडेंट आहेस, अशा शब्दांत सोनमला सुनावले. अनिल कपूर तुझे वडिल नसतील तर तुला कुणीही ओळखले नसते, अशा शब्दांत एकाने सोनमचा क्लास घेतला.