Join us
Daily Top 2Weekly Top 5

​‘पॅडमॅन’नंतर सोनम कपूरने घेतलायं एक मोठा निर्णय! जाणून घ्या काय!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2018 15:16 IST

‘पॅडमॅन’ या नुकत्याच रिलीज झालेल्या चित्रपटात लहानशा पण तेवढ्याच महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसलेल्या सोनम कपूरने एक मोठा निर्णय घेतला आहे. ...

‘पॅडमॅन’ या नुकत्याच रिलीज झालेल्या चित्रपटात लहानशा पण तेवढ्याच महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसलेल्या सोनम कपूरने एक मोठा निर्णय घेतला आहे. होय, भूमिका लहान असली तरी चालेल पण यापुढे केवळ ‘अर्थ’पूर्णचं चित्रपट निवडणार, असे सोनमने म्हटले आहे. आता तिच्या या ‘अर्थ’पूर्णचा अर्थ काय, हे मात्र आम्हाला ठाऊक नाही.अलीकडे एका ताज्या मुलाखतीत सोनम बोलली. ‘पॅडमॅन’मध्ये माझी भूमिका फार मोठी नाही. पण माझ्यासाठी ती महत्त्वपूर्ण आहे. कारण सामाजिक मुद्दा लावून धरणाºया चित्रपटाचा भाग बनणे मला अधिक महत्त्वपूर्ण वाटतं. आता केवळ मनोरंजक सिनेमा करणे म्हणजे, पोकळपणा मिरवण्यासारखे आहे, असे सोनम म्हणाली. यावेळी सोनमने ‘नीरजा’चे दिग्दर्शक राम माधवानी आणि ‘पॅडमॅन’चे दिग्दर्शक आर. के. बल्की यांचे आभारही मानलेत. मी राम माधवानी, आर. के. बल्की अशा सगळ्यांचे आभार मानते. त्यांनी मला माझ्यातील अभिनेत्रीला खºया अर्थाने व्यक्त करण्याची संधी दिली. मी दिग्दर्शकाच्या सांगण्यानुसार अभिनय करते. भूमिका लहान की मोठी हे बघून मी कधीच चित्रपटाची निवड करत नाही. असे नसते तर ‘भाग मिल्खा भाग’, ‘पॅडमॅन’ सारख्या चित्रपटात अगदी छोटीशी भूमिका केली नसती, असे सोनम म्हणाली.ALSO READ : सोनम कपूरने का मागितली सोनाक्षी सिन्हाची जाहीर माफी??मनोरंजक सिनेमापेक्षा सामाजिक मुद्याला वाहिलेले चित्रपट मला सध्या अधिक खुणावू लागले आहेत. याचे कारण म्हणजे, सध्या आपण कठीण काळातून चाललेलो आहोत. माझ्यामते, महिलांसाठी हा कठीण काळ आहे. अशास्थितीत ज्या महिलांकडे व्यासपीठ आहे, त्यांनी आपला आवाज बुलंद करायला हवा. मी तेच करतेय. ‘पॅडमॅन’साठी मला खूप वेळ द्यावा लागला नाही. पण या चित्रपटाने मला खूप मोठे समाधान दिले, असेही सोनम म्हणाली.