सोनम कपूरने बॉयफ्रेंड आनंद अहुजा सोबत काढला टॅटू!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2017 22:02 IST
sonam kapoor draw tattoo with boyfriend anand ahuja! ; पार्टी, फॅमिली सेलिब्रेशन किंवा हॉलिडे दोघेही सोबत एन्जॉय करताना दिसतात. आता पुन्हा एकदा दोघेही सोबत आले असून एका टॅटू स्टायलीशने सोनम व आनंद अहुजा यांचा फोटो शेअर केला आहे.
सोनम कपूरने बॉयफ्रेंड आनंद अहुजा सोबत काढला टॅटू!
बॉलिवूड अभिनेत्री सोनम क पूर व तिचा बॉयफ्रे ण्ड आनंद अहुजा यांच्या बातम्या चांगल्याच चर्चेत आल्या आहेत. यामागचे कारणही तसेच आहे. सोनम कपूर व तिचा कथीत बॉयफ्रेण्ड आनंद अहुजा यांना अनेकदा एकत्र पाहण्यात आले आहे. पार्टी, फॅमिली सेलिब्रेशन किंवा हॉलिडे दोघेही सोबत एन्जॉय करताना दिसतात. आता पुन्हा एकदा दोघेही सोबत आले असून एका टॅटू स्टायलीशने सोनम व आनंद अहुजा यांचा फोटो शेअर केला आहे. सोनम कपूर व आनंद अहुजा यांनी नुकतेच बॅलॅझर ब्रॅक्सेन्सी (इं’ं९२ इी१ू२ील्ल८्र) या प्रसिद्ध टॅटू स्टायलीशच्या स्टुडीओला भेट दिली. अर्थातच दोघेही टॅटू काढायला आले असतील असा अंदाज लावता येतो. टॅटू स्टायलीशने शेअर केलेल्या फोटोमध्ये सोनम कपूर व आनंद अहुजा एकमेकांशी बोलताना दिसत आहेत. या फोटोमुळे चर्चांना उधान आले आहे. काही दिवसांपूर्वी सोनम कपूर एका पार्टीत आनंद अहुजासोबत दिसली होती. याची चर्चा होत झाल्यावर मात्र सोनम नाराज झाली. काही दिवसांपूर्वी सोनम व आनंद लवकरच लग्न करणार आहेत अशा बातम्या आल्या होत्या. यावर ती जाम भडक ली. ‘लोकांनी माझ्या पर्सनल लाईफवर लक्ष न देता माझ्या बॉलिवूड करिअरच्या बाबतीत चर्चा करायला हवी’ असे मत तिने व्यक्त केले होते. सोनमच्या करिअर विषयी बोलायचे झाले तर मागील वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘नीरजा’ या चित्रपटात तिच्या अभिनयाची प्रशंसा झाली होती. या भूमिकेसाठी तिला पुरस्कारही प्राप्त होत आहेत. लवकरच तिचा आगामी वीरे दी वेडिंग या चित्रपटाची शूटिंग पुन्हा सुरू होणार आहे. आपल्या फॅशनसाठी प्रसिद्ध असलेली सोनम कपूरचा कथित बॉयफ्रेण्ड आनंद अहुजा हा मुंबईतील प्रसिद्ध फॅशन उद्योजक आहे. ">http://