Join us

एप्रिलमध्ये सोनम कपूर घेणार आनंद आहुजासोबत सात फेरे ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2018 13:55 IST

विरुष्कानंतर बॉलिवूडमध्ये अनेक सेलिब्रेटी लग्नाच्या बंधनात अडकायला सज्ज आहे. या यादीत सगळ्यात आधी नाव येते ते अभिनेत्री सोनम कपूर ...

विरुष्कानंतर बॉलिवूडमध्ये अनेक सेलिब्रेटी लग्नाच्या बंधनात अडकायला सज्ज आहे. या यादीत सगळ्यात आधी नाव येते ते अभिनेत्री सोनम कपूर हिचे. सोनम लवकरच तिचा बॉयफ्रेण्ड आनंद आहुजासोबत लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. मुंबई मिररच्या रिपोर्टनुसार दोघे या वर्षी एप्रिलमध्ये लग्न करणार आहेत. सोनम आणि आनंद ही डेस्टिनेशन वेडिंग करणार आहेत. यासाठी दोघांचे कुटुंब एप्रिलमध्ये जोधपूरला जाणार आहेत. सोनम आणि आनंदच्या लग्नासाठी जवळपास 300 पाहुण्यांची लिस्ट तयार करण्यात आली आहे.   सोनम आणि आनंद जवळपास 3 वर्ष रिलेशनशीपमध्ये आहेत. दोघांनी आपलं नातं अधिकृतरित्या कधी स्वीकरले नाही .मात्र प्रत्येकवेळी हे दोघे एकत्र बघावयास मिळत असल्याने त्यांच्यात काही तरी जवळचे नाते असावे अशी नेहमीच चर्चा रंगत आली आहे. सोनम अनेकवेळा आनंदसोबतचे फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करत असते. आनंद Bhane या फॅशन ब्रॅण्डचा मालक आहे. त्याने अमेरिकेतील व्हार्टन बिझनेस स्कूल येथून आपले शिक्षण पूर्ण केले. सोनमचा Bhane हा फेव्हरेट ब्रॅण्ड आहे. त्यामुळे बºयाचदा सोनम Bhane ने डिझाइन केलेले कपडे परिधान करून स्पॉट झाली आहे. आनंदचे वर्षाकाठीचे उत्पन्न  सुमारे २८ अरब इतके आहे. त्यामुळे असे म्हटले जात आहे की, सोनमचे लग्नही अनुष्काच्या लग्नाप्रमाणेच शाही पद्धतीने पार पडेल. नुकतेच दोघांनी नव्या वर्षांचे स्वगात पॅरिसमध्ये एकत्र केले. सोनमचा लवकरच 'वीरे दी वेडिंग' चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार बिझी आहे. या चित्रपटात सोनमशिवाय करिना कपूर, स्वरा भास्कर आणि शिखा तलसानिया यांच्या मुख्य भूमिका आहेत.‘वीरे दी वेडिंग’ चित्रपटाची कथा चार मुलींभवती फिरणारी आहे. ‘वीरे दी वेडिंग’मध्ये करिना एका आधुनिक मुलीच्या भूमिकेत तर सोनम दिल्लीतील मध्यमवर्गीय मुलगी साकारणार आहे. सोनम कपूरची बहीण रिया कपूर या चित्रपटाची सहनिर्माती आहे. करिनाच्या लग्नाला तिच्या तीन मैत्रिणी येतात आणि मग एकापाठोपाठ एक अशा धम्माल गोष्टी घडतात. महिला आणि त्यांच्या भावना या दाखवल्या जाणार आहेत