Join us

सोनम कपूरचे ‘रोमॅन्टिक’ सेलिब्रेशन, पतीला लिपलॉक करतानाचा व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2020 10:54 IST

अभिनेत्री सोनम कपूरचे न्यू ईअर सेलिब्रेशन मात्र एकदम हटके ठरले.

ठळक मुद्देसोनमच्या वर्कफ्रंट बद्दल सांगायचे तर गतवर्षी रिलीज झालेल्या ‘एक लड़की को देखा तो ऐसा लगा’  या सिनेमात ती दिसली होती.

भारतासह जगभरात नववर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. सरत्या वर्षाला निरोप देत सर्वांनी नवा वर्षाचे सेलिब्रेशन केले. बॉलिवूड सेलिब्रिटीही याला अपवाद नाही. अभिनेत्री सोनम कपूरचे न्यू ईअर सेलिब्रेशन मात्र एकदम हटके ठरले. होय, सोनमने पती आनंद आहुजाला लिप लॉक करत नव्या वर्षाचे स्वागत केले.होय, सोनम सध्या पती आनंद आहुजासोबत रोम, इटलीमध्ये आहे.  याच ठिकाणच्या रोमॅन्टिक सेलिब्रेशनचा एक व्हिडीओ सोनमने सोशल मीडियावर शेअर केला आणि क्षणात तो व्हायरल झाला. सोनम सध्या पती आनंद आहुजासोबत रोम, इटलीमध्ये आहे. 

हा व्हिडीओ शेअर करताना सोनमने लिहिलेल्या कॅप्शननेही सर्वांचे लक्ष वेधून घेतले. ‘गत वर्षाने मला खूप काही दिले. या वर्षात मी अनेक चांगले सिनेमा केले. मला अनेक चांगले लोक भेटले. जे आता माझे आयुष्यभरासाठीचे मित्र झाले आहेत. मी माझी बहीण रिया कपूरसोबत तीन सिनेमात काम केले. या दरम्यान मला एक गोष्ट ध्यानात आली ती म्हणजे बहीण खूप चांगली पार्टनर असते. 

 याच दशकाच्या प्रवासात मला आनंद भेटला. आम्ही लग्न सुद्धा केले आणि आता सुखाचा संसार करत आहोत. पण या सगळ्या व्यतिरिक्त मला या संपूर्ण दशकात एक गोष्ट शिकायला मिळाली ती म्हणजे जीवनात अनेक मार्ग असतात. पण केवळ ध्येयाकडे घेऊन जाणारा मार्गच आपल्याला निवडायचा असतो,’ असे हा व्हिडीओ शेअर करताना तिने लिहिले. शिवाय कुटुंब, मित्र, सिनेमा आणि फॅशन या सर्वांचेच आभार मानले.

   शेअर केलेल्या व्हिडीओत सोनम आणि आनंद एकमेकांना लिप लॉक किस करताना दिसत आहेत. सोनमच्या वर्कफ्रंट बद्दल सांगायचे तर गतवर्षी रिलीज झालेल्या ‘एक लड़की को देखा तो ऐसा लगा’  या सिनेमात ती दिसली होती. अर्थात समलैंगिक संबंधांवर आधारित असलेला हा सिनेमा  फारशी कमाल करु शकला नव्हता.

टॅग्स :सोनम कपूर