अभिनेत्री सोनम कपूर दुसऱ्यांदा आई होणार आहे. वयाच्या ४० व्या वर्षी ती बाळाला जन्म देणार आहे. सोनमला याआधी ३ वर्षांचा एक मुलगा आहे. त्याचं नाव वायू आहे. आता दुसऱ्या बाळाच्या स्वागतासाठी सोनम आणि आनंद आहुजा सज्ज आहेत. दोन दिवसांपूर्वीच सोनमचं डोहाळजेवण पार पडलं. यावेळी तिने परिधान केलेल्या आऊटफिटवरुन तिला ट्रोलही करण्यात आलं होतं. करीना कपूर, अर्जुन कपूर, शबाना आजमी, मसाबा गुप्ता या काही सेलिब्रिटींनी सोनमच्या बेबी शॉवरला हजेरी लावली होती. आता सोनमने या खास दिवसाचा एडिटेड व्हिडीओ शेअर केला आहे.
सोनमने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती आणि आनंद आहुजा पूजेसाठी बसले आहेत. त्यांच्या घरात सुंदर सजावट केलेली आहे. वडील अनिल कपूर, बहीण खुशी कपूर, भाऊ अर्जुन कपूर, अभिनेत्री शबाना आजमी, करीना कपूर, अनुपम खेर, फराह खान आणि इतर मित्र परिवाराची झलक दिसत आहे. सोनमला कोणी गिफ्ट देतंय तर कोणी तिच्या आशीर्वाद देत आहे. सोनमच्या चेहऱ्यावर कमालीचा प्रेग्नंसी ग्लो दिसत आहे. सोनमने व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये डोहाळेजेवणाचं महत्व सांगितलं आहे. सनातन धर्मातील १६ पवित्र संस्कारांपैकी एक असं तिने लिहिलं आहे. तसंच या आनंदाच्या प्रसंगी तिला आणि होणाऱ्या बाळाला आशीर्वाद देण्यासाठी सर्व मित्रपरिवार, कुटुंबीय उपस्थित राहिले याबद्दल तिने सर्वांचे आभार मानले आहेत.
पिवळ्या रंगाच्या लेहेंग्यात सोनम खूप सुंदर दिसत आहे. कानात ज़ड झुमके आहेत तर गळ्यात सुंदर हार आहे. सोनमने तिच्या बेबी शॉवर लूकचे वेगळे फोटोही पोस्ट केले आहेत.
सोनमच्या या व्हिडीओ आणि फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स-कमेंट्सचा वर्षाव केला आहे. पुढील महिन्यात सोनम दुसऱ्या बाळाला जन्म देईल असा अंदाज आहे. दरम्यान सध्या तिच्या प्रेग्नंसीतील फोटोशूटचीही खूप चर्चा आहे.
Web Summary : Sonam Kapoor, expecting her second child at 40, shared a baby shower video. Celebrities like Kareena Kapoor and Arjun Kapoor attended. The video shows Sonam and Anand Ahuja during prayers, surrounded by family and friends blessing the baby. Sonam highlighted the importance of the ceremony and thanked everyone.
Web Summary : सोनम कपूर, 40 वर्ष की उम्र में दूसरी बार माँ बनने वाली हैं, उन्होंने गोद भराई का वीडियो साझा किया। करीना कपूर और अर्जुन कपूर जैसी हस्तियों ने भाग लिया। वीडियो में सोनम और आनंद आहूजा प्रार्थना करते हुए, परिवार और दोस्तों से घिरे हुए, बच्चे को आशीर्वाद देते हुए दिखाई दे रहे हैं। सोनम ने समारोह के महत्व पर प्रकाश डाला और सभी को धन्यवाद दिया।