बॉलीवूडची 'स्टाईल आयकॉन' सोनम कपूर सध्या तिच्या चित्रपटांपेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळे अधिक चर्चेत आहे. अनिल कपूर यांची लाडकी लेक सोनम नुकतीच दुसऱ्यांदा आई झाली आहे. काही दिवसांपूर्वीच तिने मुलाला जन्म दिला. तर आता नुकतंच सोनमने इन्स्टाग्रामवर एक खास फोटो पोस्ट केला आहे जो सध्या इंटरनेटवर तुफान व्हायरल होत आहे.
सोनम कपूरने बाळाला कडेवर घेऊन एक सेल्फी काढला आहे. या फोटोत सोनम काहीशी थकलेली जाणवत आहे. आपल्या थकलेल्या चेहऱ्याचा आणि डोळ्यांखाली आलेल्या डार्क सर्कल्सचा उल्लेख करत तिने अतिशय मजेशीर कॅप्शन दिले आहे. तिने लिहिले की, 'डार्क सर्कल जिंदाबाद'. तिच्या या प्रांजळपणाचे आणि मातृत्वातील संघर्षाचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे.
सोनम कपूरने वयाच्या ४० व्या वर्षी दुसऱ्या मुलाला जन्म दिला आहे. २९ मार्च २०२६ रोजी मुंबईत तिने गोंडस मुलाला जन्म दिला, त्यानंतर बॉलीवूड सेलिब्रिटींसह चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला होता. सोनम अनेकदा आपल्या धाकट्या मुलासोबतचे फोटो शेअर करत असते, मात्र ही ताजी पोस्ट तिच्या चाहत्यांना अधिक भावली आहे, कारण तिने आई झाल्यानंतरच्या दगदगीचे वास्तव मांडले आहे.
अभिनेत्री सोनम कपूर आणि व्यावसायिक आनंद आहुजा यांचा विवाह ८ मे २०१८ रोजी मुंबईत शीख रितीरिवाजांनुसार पार पडला होता. या जोडप्याला आता दोन मुले असून त्यांच्या मोठ्या मुलाचे नाव 'वायू' आहे. दुसऱ्या बाळानंतर सोनमचे आयुष्य सध्या पूर्णपणे मुलांच्या संगोपनात व्यग्र असल्याचे या फोटोंवरून दिसून येते. सोनमच्या या 'नो फिल्टर' लूकवर चाहत्यांनी आपल्या पसंतीची मोहोर उमटवली आहे.
Web Summary : Sonam Kapoor, recently a mother for the second time, shared a candid photo on Instagram, showing her tired appearance and dark circles. She captioned it 'Dark circle zindabad.' Fans appreciated her honesty about the struggles of motherhood. She gave birth to her second child on March 29, 2026.
Web Summary : सोनम कपूर, हाल ही में दूसरी बार माँ बनीं, ने इंस्टाग्राम पर एक स्पष्ट तस्वीर साझा की, जिसमें उनकी थकी हुई सूरत और डार्क सर्कल्स दिखाई दे रहे हैं। उन्होंने कैप्शन दिया 'डार्क सर्कल जिंदाबाद।' प्रशंसकों ने मातृत्व के संघर्षों के बारे में उनकी ईमानदारी की सराहना की। उन्होंने 29 मार्च, 2026 को अपने दूसरे बच्चे को जन्म दिया।