Join us
Daily Top 2Weekly Top 5

अरे बापरे...! सोनम कपूरचा नवरा आनंद आहूजाला कोसळले रडू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2019 19:30 IST

सोनम कपूर व आनंद आहूजा ८ मे, २०१८मध्ये लग्नबेडीत अडकले. त्या दोघांमध्ये खूप चांगली केमिस्ट्री पहायला मिळते.

सोनम कपूर व आनंद आहूजा ८ मे, २०१८मध्ये लग्नबेडीत अडकले. त्या दोघांमध्ये खूप चांगली केमिस्ट्री पहायला मिळते. त्या दोघांचे फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर पहायला मिळतात. सोनमचा गेल्या महिन्यात 'एक लडकी को देखा तो ऐसा लगा' चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर हवा तितका प्रतिसाद मिळाला नाही. 

एका मुलाखतीत सोनम कपूरने 'एक लडकी को देखा तो ऐसा लगा' चित्रपट तिचा पती आनंद आहुजाने पाहिल्यानंतर काय रिअॅक्शन होती हे सांगितले. सोनमने सांगितले की, 'प्रामाणिकपणे सांगू, तर हा चित्रपट आनंदला खूप आवडला आणि तो रडू लागला. चित्रपट पाहिल्यानंतर त्याच्या डोळ्यात पाणी होती. आनंदला माझे चित्रपट पहायला आवडतात आणि तो हिंदी चित्रपट पाहतो. त्याचा अंदाज अपना अपना हा फेव्हरिट सिनेमा आहे. आनंद खूप सपोर्टिव्ह नवरा आहे. आता त्याने सांगितले की, मला विनोदी भूमिका करायला पाहिजे. मला परत रडवू नकोस.'

आनंद चित्रपटात काम करेल का, हा प्रश्न सोनमला मुलाखतीत विचारले असता, तिने सांगितले की, 'नाही. त्याला अभिनयात अजिबात इंटरेस्ट नाही. इतकेच नाही तर फोटोशूटदेखील नाही. 

सोनमने नुकतेच आनंदला बोरिंग मुलगा असे संबोधले होते. तिने एक व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला होता. ज्यात दोघे सोनम व आनंद रोड ट्रिपला गेले होते. व्हिडिओ शेअर करून सोनमने कॅप्शन दिले की, 'फक्त काम...अजिबात मस्ती नाही. हे आनंदला बोरिंग मुलगा बनवतात. '

टॅग्स :सोनम कपूर