Join us

​सोनम कपूर पुढच्या वर्षी याच्यासोबत करणार लग्न?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2017 16:52 IST

सोनम कपूर आणि आनंद आहुजा नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणावरून चर्चेत असतात. या दोघांनी आपले नाते कधीच अधिकृतपणे स्वीकारले ...

सोनम कपूर आणि आनंद आहुजा नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणावरून चर्चेत असतात. या दोघांनी आपले नाते कधीच अधिकृतपणे स्वीकारले नाही. मात्र अनेक वेळा सोनम आणि आनंद एकत्र क्लॉलिटी टाईम स्पेंट करताना दिसले आहेत. आता सोनम आनंद आहुजासोबत लवकरच साखरपुडा करणार असल्याच्या चर्चा रंगतायेत. काही दिवसांपासून सोनम आणि आनंदच्या रिलेशनशिपच्या बाबतीत अनेक बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. लंडनमध्ये झालेल्या अनिल कपूरच्या 60व्या बर्थ डे सेलिब्रेशनला देखील आनंद आहुजा आवर्जून उपस्थित होता. त्यावेळी या बर्थ डे सेलिब्रेशनमध्ये सोनम कपूर बॉयफ्रेंड आनंद आहुजासोबत आल्याचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. खरे तर तेव्हापासून सोनम कपूरच्या या रिलेशनशिपची चर्चा जोर धरू लागली होती. जेव्हा जेव्हा सोनमला तिच्या या रिलेशनशीपबदद्ल मीडियाकडून प्रश्न विचारले गेले, तेव्हा तेव्हा सोनमने कोणत्याही प्रकारचे उत्तर देण्याचे टाळले. मात्र आता एका मीडिया रिपोर्टनुसार सोनम कपूर तिचा बॉयफ्रेंड आनंद आहुजासह लवकरच साखपुडा करणार असल्याच्या चर्चा रंगतायेत. पुढील वर्षी मार्च किंवा एप्रिलमध्ये ते साखरपुडा करणार असल्याचे म्हटले जात आहे. साखरपुडा झाल्यानंतर ते दोघे लगेचच लग्न देखील करणार असल्याची चर्चा आहे. वीर दे वेडिंग या चित्रपटाच्या चित्रीकरणात ती सध्या चांगलीच व्यग्र आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण झाल्यानंतर ती लग्नाच्या तयारीला लागणार असल्याचे म्हटले जात आहे. आनंद हा सोनमच्या घरातील सगळ्यांचा प्रचंड लाडका आहे. तो नेहमीच त्यांच्या सगळ्या फॅमिली फंक्शनना देखील असतो. त्यामुळे सोनमचे आई वडील देखील या लग्नासाठी तयार असल्याचे म्हटले जात आहे. सोनमला नुकत्याच एका मुलाखतीत तिच्या लग्नाबाबत विचारण्यात आले होते. तू लवकरच साखरपुडा करणार असल्याच्या चर्चा आहेत असे तिला विचारण्यात आले होते. त्यावर सध्या तरी लग्नावर नव्हे तर मी कामावर फोकस करण्याचे ठरवले आहे असे तिने सांगितले होते. त्यामुळे आता खरेच सोनम लग्न करते की नाही हे कळण्यासाठी आपल्याला पुढील वर्षाची वाट पाहावी लागणार आहे. Also Read : ​सोनम कपूरसह वीरे दी वेडिंगची गर्ल गँग दिसली स्विमिंग पूलजवळ चील करताना