Join us
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाच्या काही दिवस अगोदरच सोनम कपूरने केले फोटोशूट; निळ्या रंगाच्या लहंग्यात खुलले रूप!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2018 17:14 IST

अभिनेत्री सोनम कपूर सध्या तिच्या लग्नाच्या चर्चेमुळे प्रसिद्धी झोतात आहे. नुकतेच तिने फोटोशूट केले असून, निळ्या रंगाच्या लहंग्यात तिचे रूप खूपच खुलून दिसत आहे.

बॉलिवूडची मसकली गर्ल सोनम कपूर तिच्या लग्नामुळे चांगलीच चर्चेत आहे. सोनमच्या लग्नाला केवळ नऊ दिवसांचा अवधी शिल्लक असून, संपूर्ण परिवार तिच्या लग्नाच्या तयारीत व्यस्त आहे. याच दरम्यान सोनमने काहीसा वेळ काढून एक जरबदस्त फोटोशूट केले आहे. सोनमने काही तासांपूर्वीच तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर याबाबतचे काही फोटो शेअर केले. ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.  नव्या फोटोशूटमध्ये सोनमने निळ्या रंगाचा लहंगा घातला आहे. या आउटफिटमध्ये तिचे रूप खूपच खुलून दिसत आहे. या सुंदर लहंग्यावर सोनमने चांदबाली परिधान केली आहे. ज्यामुळे तिच्या रूपाच चार चांद लागले. तुमच्या माहितीसाठी सोनमने हे फोटोशूट तिच्या आगामी ‘वीरे दी वेडिंग’ या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान केले आहे.  सोनमच्या या नव्या ‘वीरे दी वेडिंग’ या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच रिलीज करण्यात आला आहे. ट्रेलरला मिळत असलेल्या प्रेक्षकांच्या प्रतिसादामुळे चित्रपटाची संपूर्ण टीम खूश आहे. चित्रपटात सोनमसह, करिना कपूर, स्वरा भास्कर आणि शिखा तलसानिया यांच्या मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन शशांक घोष यांनी केले आहे. सध्या चित्रपटातील सर्वच कलाकार प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. दरम्यान, सोनम येत्या ८ मे रोजी बॉयफ्रेंड आनंद आहुजा याच्यासोबत साताजन्माच्या गाठी बांधणार आहे. लग्नाच्या विधी तब्बल दोन दिवस चालणार आहेत. जवळपास तीन ठिकाणी यासर्व विधी पार पडणार आहेत. सोनम आणि आनंद गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करीत आहेत. सुरुवातीला या दोघांनी त्यांच्यातील नाते सर्वश्रुत केले नव्हते. मात्र गेल्या काही महिन्यांपासून दोघे सातत्याने एकत्र बघावयास मिळत होते.